, ,

शब्द खाली पडू न देणारे ‘हायपरवड्‌र्ड्स’

June 24, 2008 Leave a Comment

इंटरनेटवर आपण सारखं काही तरी ‘शोधत’ असतो. त्यामुळेच आपल्याला कायम गुगल किंवा विकिपेडियाचा आधार लागतो. कधी एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती शोधत असतो, कधी कंपनीबद्दल, कधी पुस्तकाबद्दल, कधी स्वस्त मोबाईल कुठे आणि कितीला मिळेल याबद्दल, कधी एक्स्चेंज रेटबद्दल, कधी एक टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट्स याबद्दल...प्रत्येकाच्या शोधाचे विषय वेगळे असतील, पण शोध मात्र कायम सुरू असतो. इंटरनेट हे शेवटी एकप्रकारचे जाळेच आहे. त्यामुळे तुम्ही एकदा त्यात अडकला की अाणखी अडकत जाता. एखाद्या चांगल्या साईटवर काहीतरी वाचताना नवा शब्द समोर येतो. त्याचा अर्थ शोधण्यासाठी आपण आणखी एक सर्च देतो. त्यानंतर एखाद्या नव्या प्रोसेसचा उलगडा होतो. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अापण विकिपेडियासारख्या साईटचा आधार घेतो. काहीवेळानंतर लक्षात येतं की आपण काहीतरी वेगळंच शोधायला आलो होतो आणि आता काहीतरी वेगळंच वाचतोय. या सगळ्या गोंधळात आपल्या ज्ञानात अमूल्य भर पडते, पण मूळ जे शोधत होतो ते हाती लागत नाही. इंटरनेटच्या या मायाजालात मूळ विषयापासून दूर न जाता इतर माहिती मिळविण्यासाठी हायपरवड्‌र्ड्सची मदत मोलाची ठरते.

हायपरवड्‌र्ड्स हे फायरफॉक्ससाठी तयार केलेले एक अॅड-अॉन आहे. त्यामुळे हायपरवड्‌र्ड्स वापरण्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स हे ब्राऊजर डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. नुकतेच रिलीज झालेले फायरफॉक्स ३.० तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. हायपरवड्‌र्ड्स म्हणजे वन-स्टॉप शॉप. तुमचा कोणताही शब्द खाली पडू न देण्यासाठीच हायपरवड्‌र्ड्सची निर्मिती झालेली आहे. उदाहरणानेच समजावून देतो. समजा तुम्ही एखाद्या साईटवर खालील बातमी वाचत आहातः
Apple success linked to more than just Steve Jobs

SAN FRANCISCO (Reuters) - The thought of Apple Inc (AAPL.O: Quote, Profile, Research) without Chief Executive Steve Jobs spooks many investors, but his absence might not spell long-term disaster for the innovation machine behind the iPod and iPhone.

Last year, investment weekly Barron's estimated that Jobs accounted for $16 billion, or 20 percent, of Apple's market capitalization at the time, more than any other CEO.

यात स्टीव्ह जॉब्ज कोण आहे, तो कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुगल किंवा विकिपेडियावर जावे लागेल. अॅपल या कंपनीच्या शेअरचा ताजा भाव जाणून घेण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या साईटवर जावे लागेल. १६ बिलियन डॉलर म्हणजे किती रुपये, हे कन्व्हर्ट करण्यासाठी एखादी करन्सी कन्व्हर्ट करणारी साईट शोधावी लागेल. आता कल्पना करा की या सगळ्या सोयी केवळ माऊसच्या राईट-क्लिकवर उपलब्ध झाल्या तर? हायपरवड्‌र्ड्स नेमकं हेच काम करते.


तुम्हाला ज्या शब्दाबद्दलची माहिती हवी आहे तो सिलेक्ट केला की हायपरवड्‌र्ड्सचा मेनू डिस्प्ले होतो. यात तुम्ही त्या शब्दाबद्दलची माहिती गुगल, याहू, अास्क आदी सर्च इंजिनवर किंवा विकिपेडियावर शोधू शकता. त्यासंदर्भातील इमेजेस, व्हिडिओ पाहू शकता. एखाद्या शब्दाचे भाषांतर करू शकता, डॉलरमध्ये असलेली करन्सी रुपयांत कन्व्हर्ट करू शकता, कंपनीच्या शेअरचा ताजा भाव पाहू शकता, टेक्स्ट किंवा यूआरएल थेट कॉपी करू शकता, मोठ्या यूअारएल टाईनी किंवा स्निपयूआरएल वापरून लहान करू शकता, ब्लॉगवर पोस्ट करू शकता, ई-मेल करू शकता, त्यात दिलेल्या वस्तू ई-बे किंवा अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता आणि आणखीही बरंच काही करू शकता. हायपरवड्‌र्ड्सद्वारे काय-काय करता येतं त्याची संपूर्ण यादी तुम्ही येथे पाहू शकता. अॅड-अॉन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या-ज्या सेवा हव्या आहेत त्या तुम्ही प्रेफरन्सेसमध्ये जाऊन सेट करू शकता. तुम्ही रिसर्चर, लेखक, ब्लॉगर किंवा पत्रकार असाल तर तुमच्यासाठी हायपरवड्‌र्ड्स हे वरदान ठरू शकते.

हायपरवड्‌र्ड्स इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :2 comments »

  • narayanee said:  

    chan blog. Khup useful mahiti milate.Keep it up.

  • Amit Tekale said:  

    Thank you Narayanee for your compliments. Keep reading for more.