सेव्ह, सर्च, अॅनालाईझ अॅण्ड शेअर...

June 25, 2008 Leave a Commentकधी-कधी आपल्याला वाटतं की इन्स्टा मेसेंजर नसते तर जगता आलं असतं का. काही लोकांना इन्स्टा मेसेंजर्स म्हणजे टाईमपासचे साधन किंवा कामात व्यत्यय वाटत असेल; पण जी लोकं व्यवसायासाठी याचा वापर करतात त्यांना इन्स्टा मेसेंजर्स वरदान वाटतात. इन्स्टा मेसेंजरचा वापर मुख्यतः इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठी केला जातो. इन्स्टा मेसेंजरवरून शेअर केलेली माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत थेट पोचते. ई-मेलच्या तुलनेत ही सेवा अधिक ‘लाईव्हली’ आहे. पण बहुतांश इन्स्टा मेसेजिंग सेवा झालेले संभाषण साठवून ठेवत नाहीत. त्यामुळे ते रिट्राईव्ह करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा आपण यातून काही लिंक्स शेअर करतो, काही फोन नंबर्स शेअर करतो. ही माहिती परत मिळविण्यासाठी आणि आपण किती वेळ, कुणाशी बोललो याचे विश्लेषण करण्यासाठी डेक्सरेक्स ही सेवा वापरता येईल.


डेक्सरेक्स या अॉनलाईन सेवेचा वापर करून तुम्ही AIM, Skype, Yahoo Messenger, MSN, Google Talk, Jabber, Windows Live आदी इन्स्टा मेसेंजर्सवरून केलेल्या चॅट्स एका ठिकाणी सेव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनदेखील करावे लागत नाही. तुम्ही ज्या सेवा नेहमी वापरता त्यावर लॉग-इन होऊन एकदा डेक्सरेक्सवरून कन्फर्मेशन मिळालं आणि डेक्सरेक्स वरून डाऊनलोड केलेल प्लग-इन्स इन्स्टॉल केले की तुमच्या चॅट्स सेव्ह होण्यास सुरवात होते. हे प्लग-इन्स तुमच्या इन्स्टा मेसेंजर अकाऊंटला डेक्सरेक्सशी कनेक्ट करतात. तुम्ही काही चॅट्स अगोदर सेव्ह करून ठेवलेल्या असतील तर त्याही इम्पोर्ट करता येतात. एकदा सेट-अप झाल्यानंतर तुम्ही नाव, नंबर, लिंक काहीही शोधू शकता. एखादे संभाषण मित्रांसोबत शेअरही करू शकता. शेअर करताना काही ओळी तुम्हाला नको असतील तर त्या काढून टाकण्याची सोयही डेक्सरेक्समध्ये दिली आहे. यातील सवर्वांत सुंदर फीचर म्हणजे अॅनालिटीक सूट. यातून तुम्हाला तुमचे प्रोफाईल तयार करण्यास मदत होते. म्हणजे तुम्ही कोणाशी, किती वेळ, कोणत्या विषयावर बोललात, कोणत्या सेवेचा वापर करून बोललात वगैरे माहितीचे विश्लेषण केले जाते. तुम्ही जितके अधिक बोलाल तितके नवे टूल्स तुमच्यासाठी खुले होतात.


डेक्सरेक्सने नुकतीच नव्या फीचरची घोषणा केली असून त्याद्वारे ब्लॅकबेरीधारकांना त्यांचे एसएमएस स्टोअर करून ठेवता येणार आहेत. डेक्सरेक्स वापरायला सुरवात केल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॅकबेरीचा नंबर दिलात की तुम्हील त्यातील मेसेजेस स्टोअर करून ठेवू शकता. तेव्हा सेव्ह, सर्च, अॅनालाईझ अॅण्ड शेअर यूवर चॅट्स...

मोबाईलवरूनही चॅट करा...वाचा चटपटीत मोबाईल ‘चॅट’

Related Posts :0 comments »