चटपटीत मोबाईल ‘चॅट’
काही वेळा आपल्याजवळ लॅपटॉप नसतो. आपण कुठेतरी प्रवासात असतो. नेमक्या अशावेळी आपल्याला जर्मनीतल्या क्लाएंटचा मेसेज येतो. प्लीज कम अॉन जी-टॉक इमिजिएटली. धिस इज समथिंग अर्जंट. आता झाली का पंचाईत. ना धड कॉल करता येत, ना धड एसएमएस करता येत. आता काय करणार?
यावर एक उपाय आहे. तुमच्या मोबाईलवर जीपीअारएस अॅक्टीव्ह असेल तर तुम्ही थेट मोबाईलवरून चॅट करू शकता. मोबाईल आयएमसाठी (इन्स्टा मेसेंजर) कोणताही खर्च नाही. तुमच्या जीपीआरएस प्लॅनप्रमाणे डाटा ट्रान्स्फरचे पैसे मोजावे लागतील. अनलिमिटेड सर्फिंग असेल तर काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही.
मोबाईल अायएम सेवेसाठी अनेक पयर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे इको. हे एक फ्री अॅप्लीकेशन आहे. इको डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करून तुमचा मोबाईल नंबर दिलात की काही क्षणांत तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येतो. त्यानंतर तुम्ही मोबाईलवरूनच इको डाऊनलोड करू शकता किंवा लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करून मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. त्यानंतर ते अॅप्लीकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन दरम्यान एसएमएसवर आलेला पासवर्ड एंटर करावा लागतो. त्यामुळे तो कुठेतरी लिहून ठेवावा. आता यानंतर तुम्ही आयएमच्या टॅबवर जाऊन अॉप्शन्सवर क्लिक करा व अॅड अायएम असे म्हणा. इकोचे हे अॅप्लीकेशन जी-टॉक, एमएसएन, आयसीक्यू, याहू, जॅबर आदी सर्व आयआम सेवांना सपोर्ट करते. तुम्ही निवडलेल्या आयएम सेवेचे यूजरनेम आणि पासवर्ड दिले की तुम्ही लॉग-इन होता. आता तुम्ही बिंधास्त चॅट करू शकता. कुठेही आणि कधीही. इकोचा वापर करून स्वस्त दरांत (?) परदेशात कॉल आणि एसएमएसही करता येतात.
तुम्हाला आणखी काही मोबाईल आयएम अॅप्लीकेशन्स माहित असतील तर त्यासंदर्भात कॉमेंट बॉक्समध्ये माहिती द्या. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या इतर वाचकांना त्याचा फायदा होईल.
hi amit.
ebuddy hi IM khupch changli aahe
Thanks Vishnu for sharing this information. I hope it helps Sasotechnology readers.
Amit
hi amit,
kalach me "NIMBUZZ" he 'IM'service waprun pahili.solllllid aahe.tyat fhoto sharing.calling sagalya suvidha aahet.tarihi tu te try karun aamhala tyatil navin mahiti de.