याहू! योडलर...

June 26, 2008 Leave a Comment


याहू! आणि गुगलमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जाहिरातीसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला. त्यापूर्वी याहू! आणि मायक्रोसॉफ्टच्या तथाकथित डीलबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले गेले. सर्च इंजिनच्या बाजारात गुगल टिकणार की मायक्रोसॉफ्ट आणि याहू!च्या एकत्रित ताकदीपुढे झुकणार, मायक्रोसॉफ्टचा गुगलपुढे कसा टिकाव लागणार वगैरे, वगैरे. मी याचे विश्लेषण करणार नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून नेटीझन झालेल्या मला जी गोष्ट काल समजली ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना माहितही असेल. फार महत्त्वाची नसली तर इंटरेस्टिंग मात्र नक्की आहे...

तसा मी याहू!चा फार चाहता नाही. पण इंटरनेटची माझी ओळख झाली ती मुळी याहू!ने. मी इंटरनेटवर पाहिलेली पहिली साईट याहू! होती. या घटनेला जवळपास दहा वर्षे झाली असतील. भारतातील आद्य इंटरनेट सर्फर म्हणून शम्मी कपूर यांची ओळख आहे. शम्मी कपूरच्या जंगली या चित्रपटात या...हू...चाहे कोई मुझे जंगली कहे...या गाण्यावरून या साईटला याहू! असे नाव दिले असावे, अशी माझी संकल्पना होती. कारण त्या वेळी जेरी यांग (याहू!चे संस्थापक) यांची माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे जसे इंटरनेट फोफावत गेले तसे गुगलचे प्रस्थ निर्माण झाले आणि त्यानंतर आजतागायत गुगलची साथ सुटलेली नाही. काल अचानक एका साईटवर याहू!तील उद्गारवाचक चिह्नामागे दडलेले रहस्य उलगडले.

ज्यांना माहित नसेल त्यांनाही हे वाचून आश्चर्य वाटेल की याहू!च्या उद्गारवाचक चिह्नामागे दडलीये याहू!ची आरोळी! होय...या चिह्नावर क्लिक केल्यानंतर जो आवाज येतो तो ‘याहू योकल’ या नावाने ओळखला जातो. काल दिवसभरात मी तो किमान दहा वेळा एेकलाय...

Related Posts :



2 comments »

  • Jaswandi said:  

    sahich!
    mi pan he vachlyawar sadharan 10-12 vela ha awaj aikla... roj yahoo homepage mhanun open hota tari he kadhich kalala navhata!

    tumacha blog kharach khup informative ani mast ahe :)

  • Amit Tekale said:  

    Thank you Jaswandi for appreciating my efforts. I hope you all are getting good information out of this.
    Keep reading for more.