शून्य रुपयात व्हा ५० जीबींचे मालक!

June 27, 2008 Leave a Comment


आपल्या कॉम्प्युटरवर असलेला कोणताही डेटा डिलीट करायचा नाही म्हटलं तर काही दिवसांनी आपल्याला टेराबाईटमध्ये (१ टेराबाईट म्हणजे १००० गिगाबाईट्स) क्षमता असलेल्या हार्डडिस्क्स घ्याव्या लागतील. फ्लॉपी ते पेनड्राईव्ह आणि पेनड्राईव्ह ते पोर्टेबल हार्डडिस्क हा प्रवास पाहिला तर आताच्या १००-२०० जीबीच्या हार्डडिस्क लवकरंच नामशेष होतील. पण एक वर्ग असा आहे की ज्याला ५०-१०० जीबींचे स्टोरेजही खूप वाटते. त्याहून अधिक स्पेस मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी हरकत नाही अशांसाठी आणि ज्यांना आपला डेटा ग्लोबली अॅक्सेसिबल हवा अाहे अशांसाठी तब्बल ५० जीबींचे फ्री अॉनलाईन स्टोरेज देणाऱ्या ‘ए ड्राईव्ह’ या सेवेबद्दल आज मी माहिती देणार आहे.

अॉनलाईन स्टोरेज देणाऱ्या असंख्य सेवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. बहुतांश कंपन्या साधारण १ ते २० जीबींपर्यंतचे स्टोरेज मोफत देतात. अनलिमिटेड स्टोरेज हवे असल्यास त्यांनी अॉफर केलेल्या अनेक प्लॅन्समधून एखादा प्लॅन निवडावा लागतो. मध्यम आकाराच्या कंपन्या किंवा नवउद्योजकांसाठी अशा पेड सेवा उपयोगी ठरतात. पण व्यक्तिगत वापरासाठी सहसा कोणी पेड सेवांच्या मागे लागत नाही. त्यामुळे ५-१० जीबींच्या मोफत स्टोरेजला फारसे महत्त्व उरत नाही. अशा विविध सेवांच्या भाऊगर्दीत ‘ए ड्राईव्ह’ या सेवेने तब्बल ५० जीबींचे मोफत स्टोरेज अॉफर केले आहे. गेल्या अॉक्टोबरमध्ये बेसिक फीचर्ससह सुरू झालेल्या या सेवेने आता अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्ससह इतर सेवांना मागे टाकण्याचे ठरविलेले आहे, असे दिसते. ‘ए ड्राईव्ह’वर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही थेट फाईल अपलोड करू शकता. यात विविध फोल्डर्स आणि फाईल्स थेट अपलोड करता येतात. अपलोड केलेल्या फाईल्स तुम्ही इतरांबरोबर शेअरही करू शकता.

याच फाईल्स तुम्ही जगात कुठूनही अॅक्सेस करू शकता. शिवाय इंटरनेटवरील कोणतीही लिंक देऊन तुम्ही ती फाईल थेट ‘ए ड्राईव्ह’वर सेव्ह करू शकता. उदा. एखाद्या साईटवर उपलब्ध असलेली एमपीथ्री फाईल तुम्ही कॉम्प्युटरवर डाऊनलोड न करता त्याची लिंक ट्रान्स्फर रिमोट फाईल येथे सबमिट करून थेट ‘ए ड्राईव्ह’वर सेव्ह करता येते.

५० जीबी नको असल्यास यापैकी एखादी सेवा वापरून पाहा.
डुप्लीकेट झालेल्या फाईल्स डिलीट करण्यासाठी वाचा हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!

Thanks Ganesh

Related Posts :0 comments »