आज पाहा...उद्या वाचा

June 12, 2008 Leave a Comment


तुम्ही गुगल किंवा याहूवर काहीतरी शोधताय आणि जे हवं आहे त्याएेवजी दुसरंच काही तरी सापडतंय, असं अनेक वेळा होतं. हे दुसरं काहीतरी कितीही महत्त्वाचं असलं तरी ते त्या वेळी आपल्याला उपयोगाचं नसतं. त्यामुळे साहजिक आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते अॅड टू बुकमार्क करून ठेवतो. नंतर ज्यावेळी आपल्याला ते दुसरं काहीतरी हवं असतं तेव्हा आपण काहीतरी वाचलं होतं आणि ते अमुक एका साईटवर होतं एवढंच आठवतं. ते बुकमार्क करून ठेवल्याचंही आठवतं - पण अॉफिसमध्ये. आणि आता आपण नेमकं घरी असतो. श्या...आता काय करणार?
अशावेळी कामाला येतात त्या सोशल बुकमार्किंग सेवा. म्हणजे आपण इंटरनेटवर जे पाहतो, वाचतो ते अॉनलाईन बुकमार्क करून ठेवायचं आणि त्याचवेळी ते इतरांशीही शेअर करायचं. सोशल बुकमार्किंग म्हटलं की डेलिशियस आणि डिग या दोन सेवांची नावं प्रामुख्यानं समोर येतात. तुम्ही अद्याप या सेवा वापरल्या नसतील तर वापरून पाहा. अशीच, पण सोशल नेटवर्किंग नसलेली एक सेवा नुकतीच सुरू झाली आहे - लॅटर-धिस. या सेवेची बहुतांश फीचर्स इतर बुकमार्किंग सेवांप्रमाणेच असली तरी याचा इंटरफेस इतरांच्या तुलनेत अत्यंत साधा आणि अॉपरेट करण्यास सोपा आहे. लॅटरधिसवर अकाऊंट अोपन केल्यानंतर लॅटरधिस नावाचे बुकमार्कलेट इंटरनेट एक्स्प्लोरर, सफारी किंवा फायरफॉक्समध्ये सेव्ह करायचे. तुम्ही समजा एखादी वेबसाईट पाहत आहात आणि तुम्हाला ती पूर्ण वाचण्यासाठी आता वेळ नाहीये. तुमच्या बुकमार्कवर जाऊन लॅटरधिसवर क्लिक करा. तुम्ही थेट तुमच्या लॅटरधिस अकाऊंटवर जाल. त्यात संबंधिक वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट आलेला असेल. त्याशेजारी त्या वेबसाईटचे नाव डिस्प्ले होईल. तिथे तुम्ही तुमच्या कॉमेंट्सही लिहू शकता. सेव्ह लिंक म्हटल्यावर तुम्ही पुन्ही संबंधित वेबसाईटवर याल. अशा कितीही लिंक्स तुम्ही लॅटरधिसवर सेव्ह करून ठेवू शकता. याच लिंक तुम्ही डेलिशियसवर शेअरही करू शकता. तुमच्या अकाऊंटवर लॉग-इन झाल्यास त्यारखेनुसार सेव्ह केलेल्या लिंक्स दिसतील.
लॅटरधिससारख्याच आणखी काही सेवाः मेन्टो आणि नेटरॉकेट

Related Posts :



0 comments »