एक खिडकी योजना

June 12, 2008 Leave a Comment


तुम्हाला नेटव्हाईब्ज किंवा पेजफ्लेक्स माहित आहे का? नाही? आयगुगल तरी माहित आहे का? या सगळ्या सेवा पर्सनलाईझ्ड होम पेज या गटात मोडतात. तुमचे फेव्हरेट विजेट्स, गॅजेट्स, सोशल नेटवर्किंग साईट्स, मेल बॉक्सेस आदी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यासाठी या सगळ्या सेवा वापरतात. तुम्ही त्या अद्याप ट्राय केल्या नसतील तर करून पाहा. या यादीत गेल्या आठवड्यात एक नवे नाव दाखल झाले आहे - पेजवन्स

पेजवन्स ही सेवा या सगळ्यांपेक्षा जरा वेगळी आहे. यातून तुम्ही विविध सेवांवरील तुमचे अकाऊंट थेट अॅक्सेस करू शकता. म्हणजे यातून तुम्ही जी-मेल, याहू, हॉटमेल, एओएलमेल आदी ई-मेल सेवांपासून फ्लिकर, मायस्पेस, हाय५, फ्रेंडस्टर, डिग, डेलिशियस आदी सोशल नेटवर्किंग सेवांवरील अकाऊंट्स सुरक्षितरित्या अॅक्सेस करू शकता. ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगसह अनेक ट्रॅव्हल, मोबाईल, मनोरंजन आणि अार्थिक सेवा पुरविणाऱ्या साईट्सवरील तुमची अकाऊंट्स तुम्ही पेजवन्सवरून अॅक्सेस करू शकता. यासाठी पेजवन्सने अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून इन्फॉर्मेशन शेअरिंगचे हक्क मिळविले आहेत. यात नोंद नसलेल्या अनेक सेवांचे हक्क मिळविण्यासाठीही पेजवन्सचे प्रयत्न सुरू आहेत.

पेजवन्सवर अकाऊंट ओपन केल्यानंतर तुम्ही त्यात तुमची विविध अकाऊंट्स अॅड करू शकता. अॅड अकाऊंट म्हणून सेवेचे नाव (उदा. जी-मेल) आणि यूजरनेम, पासवर्ड टाकल्यास तुमचे अकाऊंट थेट अॅक्सेस करता येईल. नवे मेल्स तुम्ही पेजवन्समधून पाहू शकात. असे अनेक अकाऊंट अॅड करत गेल्यास तुमच्या स्क्रीनवर विविध अकाऊंट्सची थोडक्यात माहिती देणारे बॉक्सेस दिसतील. शंभर विंडोज उघडून दोनशेवेळा यूजरनेम पासवर्ड्स एंटर करण्यापासून मुक्ती हवी असेल तर पेजवन्स वापरून पाहाच...

पासवर्ड मॅनेजरबद्दल वाचाः पासवर्ड फटीग

Related Posts :



0 comments »