शॉर्टकट टू शटडाऊन...
विंडोज वापरणाऱ्यांना शॉर्टकट वापरण्याची फार सवय असते. शॉर्टकट टू डेस्कटॉप म्हणून आपण अनेक फंक्शन्स डेस्कटॉपवर साठवून ठेवत असतो. बऱ्याच जणांच्या डेस्कटॉपवर अशा अनेक आयकॉन्सची खिचडी झालेली असते. पण काहीही केलं तरं तुम्हाला शटडाऊन, रिस्टार्ट करण्यासाठी मात्र कोणताही शॉर्टकट नाही. पण...फिकर नॉट. यासाठीही एक ट्रिक आहे...
पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.
१. डेस्कटॉपवर जाऊन राईट-क्लिक करा. त्यानंतर ‘न्यू’वर कर्सर नेऊन ‘शॉर्टकट’ सिलेक्ट करा.
२. आता
अ. शटडाऊनसाठीः Shutdown -s -t 0 (Shutdownनंतर स्पेस, -s नंतर स्पेस, -t नंतर स्पेस)
ब. रिस्टार्टसाठीः Shutdown -r -t 0
क. हायबरनेटसाठीः Shutdown -h -t 0
ड. लॉग-अॉफसाठीः Shutdown -l -t 0
असे टाईप करून 'नेक्स्ट'वर क्लिक करा.
३. त्यानंतर या शॉर्टकटसाठी एखादे नाव टाईप करा (उदा. क्विकशट) आणि फिनिशवर क्लिक करा.
४. या नव्या शॉर्टकटवर राईट-क्लिक करून तुम्ही त्याचा आयकॉनही चेंज करू शकता.
नवे आयकॉन्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Such a nice blog. I hope you will create another post like this.
अमितजी
मला एक सांगाल काय ? काही u-tube वर दिसणारे आवडीचे video जर (काँम्प्यूटर स्क्रिन वर झळकणारे)
काँम्प्यूटर वर डाऊनलोड किंवा सेव्ह करण्यासाठी काय केले पाहीजे किंवा एखादे software आहे काय की स्क्रिन वर चे video पहातांनाच आपण डाऊनलोडही करु शकतो ? ते सांगावे.
धन्यवाद
सचिन
Dear Sachin,
Please check the following information.
http://sasotechnology.blogspot.com/2008/06/blog-post_951.html
I hope this solves your query.