अस्खलित उच्चारासाठी...
Luis Miguel Arconada
Che Guevara
जरा उच्चार करण्याचा प्रयत्न करून बघा. असे दुसऱ्या भाषेतील किंवा इंग्लिशमधीलच फारसे न एेकलेले शब्द आले की उच्चार करण्यास कठीण जातात. त्यामुळे चारचौघांत बोलताना आपण असे कठीण शब्द वापरायचे सफाईने टाळतो. पण काही लोकांना हे शब्द टाळता येत नाहीत. उदा. टीव्हीवर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बातम्या देणाऱ्यास एखाद्या फुटबॉलपटूचे किंवा एखाद्या शहराचे नाव उच्चारावेच लागते. दरवेळी तुम्हाला त्या भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती सापडेलंच असं नाही. मग काय करणार? यासाठी एक अॉनलाईन पर्याय उपलब्ध आहे. फोरवो!
फोरवो डॉट कॉम - तुमचा अॉनलाईन मार्गदर्शक. फोरवो हा विकिपेडियासारखा एक कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. यात सुमारे १८३ भाषांचा समावेश असून त्यातील शब्दांचे उच्चार थेट एेकता येतात. तुम्हाला एखाद्या शब्दाचा उच्चार एेकायचा असेल किंवा एखाद्या शब्दाचा उच्चार कसा आहे, हे विचारायचे असेल तर तुम्ही गेस्ट म्हणून विचारू शकता. पण तुम्हाला एखाद्या उच्चाराला रेट करायचे असेल किंवा त्याची एमपीथ्री फाईल डाऊनलोड करायची असेल तर या साईटवर रजिस्टर व्हावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हीदेखील तुमच्या भाषेतील शब्दांचे उच्चार रेकॉर्ड करून साईटवर ठेवू शकता. फोरवोवर मराठीचाही समावेश आहे. फोरवोवरील लिसन अॅण्ड लर्न सेक्शनमध्ये तुम्ही रोज अनेक नवे शब्द कसे उच्चारायचे हे शिकू शकता.
तुम्हाला केवळ इंग्लिश शब्दांचे उच्चार हवे असतील याहून अधिक सोपा पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स ब्राऊजर वापरावा लागेल. फायरफॉक्स ३.० नुकताच रिलीज झाला अाहे. त्याची वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा. फायरफॉक्ससाठी वेबस्टरने Pronounce 1.1 हे अॅड अॉन डेव्हलप केले असून ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या शब्दाचा उच्चार एेकायचा आहे तो सिलेक्ट करून राईट-क्लिक करा व Pronounce म्हणा. त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला एेकायला मिळेल.
Pronounce 1.1 इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments »
Post a Comment