कीपइट अॅण्ड फरगेट इट!
"अरे रमेश, ती दहावीची मार्कलिस्ट आहे का रे माझ्या कपाटात? जरा बघ ना. असेल तर लगेच स्कॅन करून मेल कर ना. फार अर्जंट आहे."
रमेशला कविताची मार्कलिस्ट तर सापडली पण ती स्कॅन कुठून करायची हा प्रश्न पडला होता. बहुतांश जणांकडे स्कॅनर किंवा प्रिंटर या गोष्टी घरात नसतात. डेस्कटॉप, लॅपटॉप असतो, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते, पण स्कॅनर वगैरे नसतो. आता रमेशला बाहेर जाणं आलं. स्कॅनिंग करून देणारा शोधणं आलं. काय ही कटकट, असं म्हणून रमेश निघाला. रमेशला कीपइट बद्दल माहिती नव्हती, म्हणून त्याच्यावर स्कॅनिंगसाठी बाहेर पडण्याची वेळ आली. पण तुमच्यावर असा प्रसंग नक्कीच येणार नाही.
कीपइट ही एक अॉनलाईन स्कॅनिंग सेवा आहे. यात तुम्ही मोबाईल किंवा डिजीटल कॅमेऱ्याने काढलेले फोटो थेट पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करून मिळतात. उदा. रमेशने जर कविताच्या मार्कलिस्टचा मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढला असता आणि तो कीपइटवर अपलोड केला असता तर कविताला थेट तिच्या मार्कलिस्टची पीडीएफ कॉपी मिळाली असती. बऱ्याचवेळा आपण काही महत्त्वाच्या नोट्स लिहून घेतो आणि नंतर नेमके तेच पान आपल्याला सापडत नाही.
कीपइट असे काम करते...
एखाद्या सेमिनारला गेल्यावर व्हाईटबोर्डवर लिहिलेली माहिती पटापट उतरवून घेण्याच्या नादात वक्ता समजावून देत असलेला मुद्दा सुटतो आणि पुढे कसलाच संदर्भ लागत नाही. अशावेळी तुम्ही व्हाईटबोर्डचा फोटो काढला आणि तो कीपइटला मेल केला की काही सेकंदात त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला मिळते. नोट्सच्या बाबतीतही हेच करता येईल. फोटो काढायचा आणि कीपइटला पाठवायचा. यात तुम्ही कलर आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट अशा दोन पयर्यायांत फाईल मागवू शकता. पीडीएफ झालेल्या फाईल्स इतरांना मेल किंवा फॅक्सही करता येतात.
मूळ कॉपी कीपइट कॉपी
कीपइटप्रमाणेच स्कॅनर नावाचीही एक सेवा उपलब्ध आहे. मात्र, स्कॅनरसाठी किमान 2 मेगापिक्सेल कॅमेऱ्यातून काढलेले फोटो लागतात. कीपइटमध्ये 1.3 मेगापिक्सेल कॅमेऱ्यातून काढलेले फोटोही चालतात.
superb post!
thanks for the very useful information
Dear Harekrishnaji and Anonymous, Thanks for reading the post. Keep reading for more...
very very usefull info u have given, thanks amit.
this is a superb idea
Awesome man...It saved a lot of scanning time & money too :)