दररोज बदला ‘प्रोफाईल’ पिक्चर

July 1, 2008 Leave a Comment


वीकेन्डला मस्त आऊटिंग करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मोबाईलमधले फोटो पाहू लागतो. काल धबधब्यात भिजताना, धाब्यावर जेवताना काढलेले फोटो आणि व्हिडीओ अॉरकुट, फेसबुकवर अपलोड करत सुटतो. त्यातल्या एका ग्रुप फोटोत, ए तू किती क्यूट आलायेस, अशी मैत्रिणीने दिलेली कॉमेंट सारखी आठवत राहते. आता हाच फोटो प्रोफाईलला लावावा, असा विचार करून आपण त्या ग्रुप फोटोतील आपला चेहरा प्रोफाईल पिक्चर म्हणून सेट करायला पाहतो. पाऊण तासाच्या मेहनतीनंतरही हातात काहीच लागत नाही. तो फोटो प्रोफाईल पिक्चरसाठी लागणाऱ्या साईझमध्ये नसतो. म्हणजे त्याहून कितीतरी अधिक हेवी असतो. प्रोफाईल पिक्चरसाठी साधारण काही केबींची साईझ लागते. त्यामुळे तो काही केल्या अपलोड होत नाही. बरं, साईझ कमी असली तर त्यातला नेमका आपला चेहरा नीट दिसत नाही. चंद्रावरील काळे डाग वगैरे काहीतरी कॅटेगरीतला तो फोटो वाटू लागते. फोटो रिसाईझ आणि करेक्ट करण्यासाठी आपल्याकडे फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअरही नसते. शेवटी आपण तो नाद सोडून देतो. अशावेळी मायपिक्चर नावाची सेवा उपयोगी ठरते.

मायपिक्चर ही सेवा नेमक्या अशाच परिस्थितीत आपल्याला मदत करते. केवळ तीन स्टेप्समध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही अॉनलाईन सव्हर्व्हीस प्रोफाईलसाठी पिक्चर तयार करू शकता. मायपिक्चरसाठी रजिस्ट्रेशनदेखील करावे लागत नाही. यासाठी कोणत्याही साईझचा, रिझॉल्यूशनचा फोटो चालतो. तुम्ही मायपिक्चरच्या होमपेजवर जाऊन तुम्हाला हवा असलेला फोटो अपलोड करायचा. त्यानंतर तो फोटो ज्या साईटवर प्रोफाईल पिक्चर म्हणून अपलोड करायचा आहे ती साईट सिलेक्ट करायची.

त्या साईटच्या स्पेसिफिकेशन्सनुसार फोटोची पिक्सेल साईझ बदलून घेतली जाते. आता तुमच्या फोटोवर आलेला बॉक्स तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा व पिक्चर इटवर क्लिक करायचं. तुमचा फोटो डाऊनलोड करून घ्या, असा एक मेसेज येतो. त्यावर क्लिक केलं की तुमचा फोटो डाऊनलोड होतो. आता हा फोटो तुम्ही प्रोफाईल पिक्चर म्हणून अपलोड करू शकता. तुम्हाला हवी असलेली साईट मायपिक्चरच्या ड्रॉपडाऊन मेनूत नसली तरीही तुम्ही हवी ती पिक्सेल साईझ निवडून प्रोफाईल पिक्चर तयार करू शकता.

Related Posts :1 comments »

  • Anonymous said:  

    я считаю: мне понравилось!! а82ч