,

कीप दॅट टॅब

July 2, 2008 Leave a Commentएखाद्या विषयाबद्दल माहिती जमवताना आपण विविध कीवडर्ड्स देऊन सर्च करत असतो. त्यातील काही वेबसाईट्सवर अत्यंत उपयुक्त, काहींवर तुलनेने कमी तर काहींवर अगदीच असंबंध माहिती मिळते. ज्यावर उपयुक्त माहिती मिळते त्या वेबसाईट्स आपण तशाच ओपन ठेवतो किंवा बुकमार्क करतो (अॉनलाईन बुकमार्किंगसाठी वाचाः आज पाहा...उद्या वाचा). ज्या साईट्सवर तुलनेने कमी महत्त्वाची माहिती मिळते त्या वाचून आपण लगेच क्लोज करतो. इंटरनेट एक्स्प्लोरर ७, फायरफॉक्स, सफारी किंवा अॉपेरा आदी ब्राऊजर्स वापरणाऱ्यांना टॅबमध्ये ब्राऊज करण्याची सवय असते. एकाचवेळी भरपूर टॅब्ज अोपन असले की कायम काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणजे ज्या साईटवर एखादी चांगली लिंक असते ती नेमकी आपण क्लोज करतो. आता ही अपघाताने क्लोज केलेली साईट पुन्हा कशी शोधायची?

सफारीः तुम्ही सफारी वापरत असाल तर शेवटी क्लोज केलेले सर्व टॅब दिवसांनुसार पाहायला मिळतील. यासाठी मेनूबारमध्ये हिस्ट्रीवर जाऊन Reopen Last Closed Window यावर क्लिक करा.

अॉपेराः अॉपेरा ब्राऊजरमध्ये शेवटी क्लोज केलेला टॅब ओपन करण्यासाठी Ctrl+Alt+Shift+Z हा शॉर्टकट तुम्ही वापरू शकता. अन्यथा टॅब बारमध्ये सर्वांत उजवीकडे असलेल्या ट्रॅश कॅनवर क्लिक करून शेवटी क्लोज केलेल्या साईटवर क्लिक करू शकता.

फायरफॉक्सः मोझिला फायरफॉक्समध्ये नवा टॅब ओपन करण्यासाठी आपण Ctrl+T हा शॉर्टकट वापरतो. याच धर्तीवर शेवटी क्लोज केलेला टॅब ओपन करण्यासाठी Ctrl+Shift+T असा शॉर्टकट वापरावा.

इंटरनेट एक्स्प्लोरर ७ः आयई ७ मध्ये ही सेवा इन-बिल्ट नसली तरी MuvEnum नावाच्या कंपनीने यासाठीचे अॅड-अॉन डेव्हलप केले आहे. ओपन लास्ट क्लोज्ड टॅब हे अॅड अॉन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही Alt+X हा शॉर्टकट वापरून शेवटी क्लोज केलेला टॅब ओपन करू शकता. त्याचप्रमाणे Alt+Q हा शॉर्टकट वापरून काही वेळापूर्वी क्लोज केलेल्या साईट्सही पाहू शकता.

Related Posts :0 comments »