,

बॅक-अप युवर मोबाईल कन्टेन्ट

July 5, 2008 Leave a Comment

दर दोन महिन्यांनी मोबाईल हॅंडसेट बदलणाऱ्या एका तरुणाची बातमी परवाच कुठेतरी वाचली. मनात अालं, नव्या मोबाईलच्या नादात त्याला बिचाऱ्याला किती कष्ट करावे लागत असतील...एका मोबाईलमधला डेटा दर दोन महिन्यांनी दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्स्फर करायचा. त्यात परत कम्पॅटिबिलीटी इश्यू आले. नंबर उलटे-सुलटे होणार. एसएमएसचं काय? सिमकार्डवर स्टोअर केलेले एसएमएस तसेच राहतात, पण फोन मेमरीवरील एसएमएसचं काय? नोट्स, रिमाईंडर्स आदी सगळ्या गोष्टी परत फीड कराव्या लागणार...कितीही म्हटलं तरी हा एक वेळखाऊ प्रकार आहे. सारखा हॅंडसेट बदलणं टाळलं तरी आहे तो हॅंडसेट चोरीला गेल्यावर तर आपल्या हातात काहीच उरत नाही. ना नंबर्स, ना एसएमएस, ना रिमांईंडर्स. या परिस्थितींचा सामना करण्यासाठी काही अत्यंत सोप्या आणि मोफत अॉनलाईन सेवांचा वापर आपण करू शकतो. 


मोबाईलमधील डेटा आहे तसा अॉनलाईन ठेवण्यासाठी व भविष्यात इतर कोणत्याही हॅंडसेटवर ट्रान्स्फर करण्यासाठी मोबीकॉल ही एक उत्तम सेवा आहे. मोबीकॉल वापरण्यासाठी आपल्याकडे सिंक-एनेबल्ड मोबाईल आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. सिंबियन किंवा विंडोज मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिम असलेल्या हॅंडसेट्समध्ये सिंक्रोनायझेशनची सुविधा असते. तुमच्या हॅंडसेटवर मोबीकॉलची सेवा वापरता येऊ शकते किंवा नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा. असल्यास तुम्हाला सर्वप्रथम मोबीकॉलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही एसएमएसद्वारे फोन सेटिंग्ज मागवू शकता किंवा मॅन्युअलीही सेटिंग्ज करू शकता. मॅन्युअल सेटिंग्ज करताना काळजीपूर्वक सर्व गोष्टी एंटर कराव्यात. त्यानंतर तुमच्या सिंक मेनूमध्ये मोबीकॉल नावावर क्लिक केल्यास तुमच्या फोनमधील माहिती मोबीकॉलच्या सर्व्हरशी सिंक्रोनाईझ होण्यास सुरवात होते. हा सर्व डेटा तुम्ही तुमच्या मोबीकॉल अकाऊंटवरून अॅक्सेस करू शकता. जेव्हा तुम्ही हॅंडसेट बदलता तेव्हा मोबीकॉलवर जाऊन हॅंडसेट चेंज करायचा व पुन्हा सेटिंग्ज करायच्या. त्यानंतर सिंक म्हटल्यावर तुमच्या मोबीकॉल अकाऊंटवर असलेली सगळी मािहती मोबाईलवर जीपीआरचा वापर करून स्टोअर होते.

झिबमार्फतही अशाच प्रकारची मोफत सेवा दिली जाते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे झिब ही एक सोशल नेटवर्किंग साईटदेखील आहे. म्हणजे झिबवर रजिस्टर केलेला प्रत्येक जण या नेटवर्कचा एक भाग बनतो. दोन महिन्यांपूर्वीच व्होडाफोनने झिबला संपादित केले आहे.

Related Posts :0 comments »