, ,

फ्लिकर आणा डेस्कटॉपवर!

July 4, 2008 Leave a Comment

एखाद्या पिकनिकवरून आल्यावर आपण किमान पन्नास-शंभर फोटो घेऊन येतो आणि ते फ्लिकर किंवा पिकासासारख्या अॉनलाईन फोटो-शेअरिंग साईट्सवर अपलोड करतो. त्यातील चांगले फोटो निवडा, फ्लिकरवर लॉग-इन व्हा, फोटो अपलोड होण्याची वाट पाहा याचा अनेकदा कंटाळा येतो आणि कालांतराने फ्लिकरचा पासवर्डही आपण विसरतो. सोशल स्फीअरमध्ये तुम्ही कायम अॅक्टीव्ह राहायला हवं. त्यामुळे अनेक ओळखी होऊन त्याचा फायदाही होतो. फ्लिकरवर अॅक्टीव्ह राहण्यासाठी तुम्हाला जर एखादा डेस्कटॉप क्लाएंट मिळाला तर?

मॅकिन्तोश वापरणाऱ्यासांठी एक Infinite-Sushi या कंपनीने तयार केलेले १००१ - फ्लिकर अॅक्सेसरी हा डेस्कटॉप क्लाएंट तुम्ही वापरू शकता. १००१ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. १००१ इन्स्टॉल केल्यानंतर अॅप्लीकेशन लॉंच करा. पहिल्यांदा लॉंच केल्यावर तुम्हाला फ्लिकरचे अकाऊंट अॉथेन्टिकेट करावे लागेल. ते केल्यानंतर तुम्हाला एक डिफॉल्ट फोटो स्ट्रीम पाहायला मिळेल. या स्ट्रीममध्ये फ्लिकरवर अपलोड झालेले ताजे फोटो, तुम्ही अॅड केलेल्या मित्रांचे फोटो किंवा तुम्हाला हव्या असलेल्या टॅगचे फोटो पाहायला मिळतील. Streams→Edit Streams यात जाऊन तुम्ही या सेटिंग्ज बदलू शकता. स्ट्रीम नको असल्यास, तोही अॉप्शन तुम्ही सेट करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी आता तुम्हाला फ्लिकरवर जाण्याची गरज नाही.

१००१ या डेस्कटॉप क्लाएंटचा वापर करून फोटो अपलोड करणं अतिशय सोपं आहे. याचा आयकॉन तुमच्या डॉकमध्ये असेल तर तुम्हाला जे फोटो अपलोड करायचे आहेत ते ड्रॅग करून यात टाका किंवा Image→Upload येथे जाऊन अपलोड करा. या फोटोंना टॅग करणे, रिसाईझ करणे आदी सगळ्या गोष्टी तुम्ही थेट १००१ मधून करू शकता.विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यासांठीही असे अनेक डेस्कटॉप क्लाएंट्स डेव्हलप केलेले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणेच हे डेस्कटॉप क्लाएंट्स काम करतात. विंडोजसाठी पॉप्युलर आणि अॅडव्हान्स्ड क्लाएंट आहे पॉवरस्नॅप. विशेष म्हणजे हे अॅप्लीकेशन भारतीय इंजिनिअर्सनी डेव्हलप केलेले आहे.
पॉवरस्नॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
फ्लिकरवरील फोटोंना फोटो-टॅग करण्यासाठी वाचाः गो...गेट इट; नव्हे गो...टॅग इट!


Related Posts :0 comments »