, ,

‘कोट’-अन‘कोट’

July 7, 2008 Leave a Comment


रिसर्चर्स, ब्लॉगर्स आणि कॉर्पोरेट जगतातील जवळपास सरळ्यांना रेफरन्सेस अत्यंत महत्त्वाचे असतात. यासंदर्भात अमुक एका संस्थेने किंवा ब्लॉगरने असे म्हटले होते की..., असे दाखले सगळीकडे द्यावे लागतात. अशावेळी आपल्याला संबंधित दाखल्यांचे थेट स्क्रीनशॉट मिळतात. पण ते प्रेझेंटे करता येत नाहीत. म्हणजे त्यांच्या इमेजेस तयार करण्यासाठी भली मेहनत घ्यावी लागते. एखाद्या साईटवरील माहिती आहे त्या स्वरुपात द्यायची झाली तर आधी प्रिंट स्क्रीन करा, मग ती इमेज फोटोशॉप किंवा पेंटब्रशमध्ये न्या, हवा तो पोर्शन सिलेक्ट करा. एवढ्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ‘कोट’ (Kwout) ही सेवा वापरायलाच हवी.

‘कोट’ या सुटसुटीत सेवेच वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ज्या साईटमधील पोर्शन जसाच्या तसा हवा आहे त्या साईटचा अॅड्रेस ‘कोट’मध्ये एंटर केलात की ‘कोट’तफर्फे त्या साईटचा एक स्क्रीनशॉट घेतला जाते. त्यानंतर तुम्ही त्यातील हवा तो पोर्शन सिलेक्ट करून कट आऊटवर क्लिक करायचं. तुम्हाला हवा असलेला पोर्शन तुम्ही थेट इमेज म्हणून सेव्ह करू शकता, किंवा थेट तुमच्या फ्लिकर अकाऊंटवर अपलोड करू शकता किंवा त्याचा एचटीएमएल कोड तुमच्या साईट किंवा ब्लॉगमध्ये टाकू शकता - अॅज सिंपल अॅज दॅट!
('कोट'चाच वापर करून 'कोट'च्या साईटवरून ही इमेज कट केली आहे!)

‘कोट’चे फायरफॉक्स अॅड-अॉनही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर दरवेळी ‘कोट’वर जाऊन साईट एंटर करण्याची गरज नाही. फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात ‘कोट’चा आयकॉन असतो. त्यावर क्लिक करून साईटवरील पोर्शन सिलेक्ट करा व कट आऊट म्हणा. इतर ब्राऊजरसाठी ‘कोट’चे बुकमार्कलेट उपलब्ध आहे. तुमच्या साईट अथवा ब्लॉगमधील माहिती इतरांनी ‘कोट’ करावी असे वाटत असल्यास तुम्ही ‘कोट’चा कोड तुमच्या साईट किंवा ब्लॉगमध्ये इंटिग्रेट करू शकता.

Related Posts :



1 comments »

  • Anonymous said:  

    भारी. . . .माहीत नव्हतं राव आपल्याला हे