,

ट्रॅक युवर पॅकेज

July 10, 2008 Leave a Comment


तुमची स्वतःची कंपनी असेल तर तुम्हाला ई-मेलबरोबर स्नेल मेलही पाठवावे लागत असतील. भारतीय डाक विभागाने कितीही कात टाकली असेल तरी आपण खासगी कुरियर कंपन्यांचाच अधिक वापर करतो. परदेशात एखादे महत्त्वाचे कुरियर पाठवायचे असेल तर भारतीय डाक विभागापेक्षा आपण यूपीएस किंवा फेडएक्सलाच प्राधान्य देऊ. असो. तर ई-मेलच्या जमान्यातही आपल्याला काही महत्त्वाच्या कामांसाठी कुरियर सेवा वापरावीच लागते. बहुतांश खासगी कुरियर कंपन्या पॅकेज ट्रॅक करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक देतात. त्यांच्या साईटवर जाऊन सदर पॅकेज सध्या कुठे आहे ते ट्रॅक करू शकतो. पण आपल्याला दिवसाला वेगवेगळ्या कंपन्याची १५-२० पॅकेजेस ट्रॅक करायला सांगितली तर? तुम्ही म्हणाल, केवळ अशक्य! यासाठी पुन्हा इंटरनेटच आपल्या कामाला येतं. विविध कंपन्याची पॅकेजेस एकाच ठिकाणाहून ट्रॅक करण्यासाठी अनेक अॉनलाईन सेवा वापरू शकता. ट्रॅक द पॅक ही त्यापैकीच एक...

ट्रॅक द पॅकचा या साध्या-सोप्या सेवेच्या माध्यमातून तुम्ही यूपीएस, फेडएक्स, डीएचएल आणि यूएसपीएसचे (युनायटेड स्टेट्स पोस्टल सव्हर्व्हीस) पॅकेजेस ट्रॅक करू शकता. यात तुमचे पॅकेज पोस्ट केल्यापासूनच्या प्रत्येक अॅक्शनची माहिती तुम्हाला नकाशासह मिळते. ही सेवा मोफत असून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही एसएमएस अलर्टही मागवू शकता. तुम्हाला दिवसांत ट्रॅक करायला लागणाऱ्या पॅकेजेसची संख्या खूप मोठी असेल तर तुम्ही फायरफॉक्ससाठी असलेले एक्स्टेंशनही वापरू शकता. ट्रॅक द पॅकचे फायरफॉक्स एक्स्टेंशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



पॅकेजट्रॅकर ही देखील अशीच एक सेवा असून याचे गुगल गॅजेट, व्हिस्टा साईडबार गॅजेटही उपलब्ध आहे.
पॅकेजमॅपिंग या सेवेत तुम्ही यूपीएस, फेडएक्स, डीएचएल आणि यूएसपीएसचे पॅकेजेस ट्रॅक आणि मॅप करू शकता.
पॅकट्रॅक ही या गटात मोडणारी आणखी एक सेवा.

या सर्व सेवा थोड्याबहुत फरकाने एकसारख्याच आहेत. तुम्हाला अशा प्रकारच्या सेवेची गरज असेल तर यापैकी कोणतीही सेवा तुम्ही निवडू शकता.

Related Posts :



0 comments »