,

मुलांसाठी ज्ञानरंजन - टूटपप

July 9, 2008 Leave a Commentनेहमीच्या टिप्स आणि अॅप्लीकेशन्सपासून आज थोडा ब्रेक घ्यावा असा विचार केला. तुम्हालाही थोडा ब्रेक हवाच असेल ना? योग्य वापर केला तर नवी टेक्नॉलॉजी किती साधी-सोपी आणि आपल्या गरजेची आहे, याची प्रचिती तुम्हाला येत असेल. यावर लिहावे तेवढे थोडेच आहे. असो. तर काही वेळा आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टी लहान मुलं अगदी लीलया करून दाखवतात. उदा. मोबाईलमधले अनेक फंक्शन्स - जी आपन कधी ओपन करूनही पाहत नाही - ती ही मुलं सहज हाताळतात. लॅपटॉप, इंटरनेट याबाबतीतही हे असंच होतं. त्यामुळे मुलांना या गोष्टींपासून दूर कधीही ठेवू नका. त्यांना वापरू द्या. त्यातली गंमत त्यांना कळू द्या. एका गमतीशीर आणि मुलांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या साईटची मी आज ओळख करून देणार आहे.

गणित म्हटलं की मुलांना कायम भीती वाटते. पण ही भीती घालवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही मुलांना टूटपप या साईटची ओळख करून देऊ शकता. यात गणिताशी संबंधित तीन आणि स्पेलिंगचा एक असे एकूण चार गेम्स आहेत.तुम्ही गेस्ट म्हणूनही खेळू शकता किंवा रजिस्टर्ड मेंबर म्हणूनही खेळू शकता. तुमच्यासोबत त्याक्षणी अॉनलाईन असलेला इतर कोणीही प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असतो. यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकारावर आधारित तीन गेम्स आहे. पैकी एकामध्ये केवळ एक क्रिया असलेले, दुसऱ्यात एकाहून अधिक क्रिया असलेले तर तिसऱ्यात केवळ गुणाकार असलेले प्रश्न आहेत. यापैकी एखादा गेम सिलेक्ट केल्यास त्यात आणखी काही पयर्याय आहेत. त्यानंतर लेव्हल सिलेक्ट करावी लागते व स्टार्ट म्हटल्यानंतर ठराविक वेळेत जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील तितकी द्यायची. स्पेलिंगच्या गेममध्ये एखादा शब्द उच्चारला जातो, त्यावरून तो स्पेल करायचा. हसत-खेळत ज्ञानरंजन करण्यासाठी ही साईट खूप उपयोगी ठरते.
या साईटचा वापर हा सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहेत. तुम्ही सात दिवसांनंतर आलेल्या ई-मेलवरून कन्फर्मेशन दिले नाही तर आठव्या दिवसापासून ही साईट तुमच्या मुलाला अॅक्सेस करता येणार नाही. त्यामुळे मुलं याच्या आहारी जातील, अशी भीती बाळगू नका. उलट तुम्हीच याच्या आहारी जाण्याची शक्यता आहे...

वाचाः लहानग्यांसाठीचे ‘गुगल’

Related Posts :0 comments »