,

सुपर इनबॉक्सः मो-मेल

July 14, 2008 Leave a Comment


तुमच्या साध्या फोनला ब्लॅकबेरीत कसं कन्व्हर्ट करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी यापूवर्वीच्या एका पोस्टमध्ये (वाचाः गिफ्ट युवरसेल्फ अ ब्लॅकबेरी!) दिली होती. त्यात दिलेल्या सेवांपैकी एखादी सेवा वापरून काही जणांनी आपल्या स्मार्टफोनला ब्लॅकबेरीत कन्व्हर्ट केलंही असेल. तुम्ही मिळणाऱ्या सेवेबाबत आनंदी असाल तर उत्तम. पण नसाल तर त्याहून साधा आणि सोपा मार्ग आता उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही जी-मेल, हॉटमेल,याहू आदी अकाऊंटवर येणारे मेल थेट मोबाईलवर पाहू शकता. पुश-मेल टेक्नॉलॉजी वापरून मास्टर इनबॉक्स तयार करण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे मो-मेल!

मोबाईल मेल अथर्थात मो-मेल ही सेवा सध्या बीटा फेजमध्ये असून तिचा वापर करण्यासाठी तुम्हाला बीटा पासवर्ड मागावा लागेल. बीटा पासवर्ड रिक्वेस्टसाठी मो-मेल डॉट कॉमवर जावे लागेल. बीटा पासवर्ड मागितल्यानंतर साधारण पाच-सहा दिवसांत मिळतो. त्यानंतर तो पासवर्ड वापरून तुम्ही मो-मेल इंडिया या साईटवर रिडायरेक्ट व्हाल. स्वीडनस्थित मो-मेल जगातल्या ३५ देशांत आपली सेवा देते. पुश-मेल सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत मो-मेलचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे अॅप्लीकेशन इन्स्टॉल करावे लागत नाही. मो-मेलवर रजिस्टर होताना तुम्हाला मोबाईल नंबर, मोबाईल अॉपरेटर आणि फोनचे मॉडेल एवढी माहिती द्यावी लागते. तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा यूजर आयडी होतो. रजिस्टर झाल्यानंतर मो-मेलच्या सेटिंग्ज तुमच्या मोबाईलवर थेट येतात. त्या फक्त सेव्ह करायच्या. त्यानंतर तुम्हाला ज्या अकाऊंटमधील मेल्स मोबाईलवर हव्या आहेत त्यातील सेटिंग्जमध्ये किरकोळ बदल करावे लागतात. त्यानंतर तुमचे मो-मेल पुश-मेल अॅक्टीव्हेट होते.

तुम्ही यात जी-मेल, हॉटमेल, एमएसएन, मॅक, याहू आणि इतर अकाऊंट्स अॅड करू शकता. तुम्ही जेव्हा मो-मेलवर अकाऊंट तयार करता त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर अॅट मो-मेल असा एक नवा ई-मेल अॅड्रेस तयार होतो आणि तुम्ही इतर अकाऊंटवरील मेल्स मो-मेलवर फॉरवर्ड करता. पण मो-मेलवर आलेल्या मेलला उत्तर देताना तो ई-मेल ज्या अकाऊंटवरून आलेला असेल त्याच नावाने उत्तर जाते. मो-मेलमधील इंटेलिजन्समुळे हे शक्य होते. मो-मेलसाठी तुमचे जीपीआरएस अॅक्टीव्ह असणे आवश्यक आहे. तुम्हाला जीपीआरएस वापरल्याचा आर्थिक फटका बसू नये याची पुरेपूर काळजी मो-मेलने घेतली आहे. मो-मेलद्वारे मेल आणि सोबत आलेल्या अॅटॅचमेंट्सचा साईझ जवळ-जवळ ९५ ते ९९ टक्क्यांपर्यंत कमी केला जातो. उदा. एखादा ३ एमबीचा फोटो मो-मेलवर आल्यानंतर १४ केबींचा होतो आणि तो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने रिसाईझ केला जातो. मो-मेल ही सेवा आयफोनवरदेखील वापरता येते.

Related Posts :0 comments »