,

गिफ्ट युवरसेल्फ अ ब्लॅकबेरी!

June 11, 2008 Leave a Comment


भारतातील ब्लॅकबेरी सर्व्हीसवरची टांगती तलवार अजून हटलेली नाहीये. सुरक्षिततेच्या कारणावरून केंद्र सरकारने कॅनडास्थित रिसर्च इन मोशन (रिम) या कंपनीला ब्लॅकबेरीचे मेल साठविणारे एन्टरप्राईज सर्वर्स भारतात बसविण्याचे सांगितले आहे. असे केल्यास रिमची आर्थिक गणिते चुकू शकतात. अर्थात हा वाद अजूनही संपलेला नाही. पण एक गोष्ट मात्र झाली आहे - साधारण सात-आठ वषर्षांपूर्वी मोबाईल असणं हा स्टेटस सिंबॉल होता, दोन-तीन वषर्षांपूर्वी महागडा मोबाईल बाळगणं हा स्टेटस सिंबॉल होता आणि आता ब्लॅकबेरी वापरणं हा स्टेटस सिंबॉल झालाय. ज्यांच्याकडे ब्लॅकबेरी नाही, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. कारण तुमच्या साध्या फोनला ‘ब्लॅकबेरी’त कसं कन्व्हर्ट करायचं हे सांगतो. पुढे वाचत तर जा...

तुमच्या साध्या फोनवर (साधा म्हणजे, अगदीच साधा नाही हं. ज्या फोनमध्ये अॅक्टीव्ह जीपीआरएस आहे त्याच फोनवर ही सुविधा मिळू शकेल) ब्लॅकबेरीसदृश पुश-मेल सेवा मिळण्याकरिता तीन अॅप्लीकेशन्स आहेत.

१. इमोझेः आऊटलूक, लोटस नोट्स आणि जी-मेल सिंक्रोनाईझ करण्यासाठी इमोझे अत्यंत उपयुक्त आहे. इमोझे मोबाईल क्लाएंट डाऊनलोड करण्यासाठी इमोझे डॉट कॉमवर जा. तेथे गेट इमोझेवर क्लिक करून तुमचा हॅंडसेट निवडा. त्यानंतर मॅन्युअल सेट-अप आणि एसएमएस सेटिंग्ज असे अॉप्शन्स असतील. त्यातील एक सिलेक्ट करा. मॅन्युअस सेट-अप सिलेक्ट केल्यास मोबाईलमधील ई-मेल सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला दिलेल्या सूचना फॉलो कराव्या लागतील. एसएमएसचा अॉप्शन सिलेक्ट केल्यास मेसेजद्वारे मिळालेल्या सेटिंग्ज थेट सेव्ह करा. त्यानंतर ई-मेल सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचे जी-मेल यूजरनेम आणि पासवर्ड द्या. मोबाईलच्या मेसेज मेनूमध्ये इमोझे नावाचं फोल्डर तयार झालेलं असेल. त्यातील इनबॉक्समध्ये जाऊन गेट अॅंड सेन्ड म्हटलं की तुम्हाला आलेले मेल थेट मोबाईलवर पाहता येतील.


२. कोटर्टाडोः ई-मेल क्लाएंट असलेल्या कोणत्याही मोबाईलवर कोटर्टाडोची पुश-मेल सव्हर्व्हीस वापरता येते. कोटर्टाडो डॉट कॉमवर जाऊन कोटर्टाडो फ्रीवर क्लिक करा. तिथे रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दिलेल्या सूचनांनुसार सेटिंग्ज केल्या की तुमची सर्व्हीस सुरू होईल. कोटर्टाडोची सर्व्हीस कोणत्याही POP (Post Office Protocol) किंवा IMAP (Internet Message Access Protocol) या रिमोट मेलबॉक्स अॅक्सेस प्रोटोकॉलला सपोर्ट करणाऱ्या मेलसाठी लागू होते.


३. एमअॉरेंजः यात पुश-मेलसह अनेक व्हॅल्यू अॅडेड सर्व्हीसेस मिळतात. याद्वारे तुम्ही एमएसएन, जी-टॉक, याहू मेसेंजर किंवा अन्य कोणतेही इन्स्टन्ट मेसेंजर वापरून मोबाईलवरूनच चॅट करू शकता. तसेच तुमच्या मोबाईलवरून डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरील एखादी फाईलही अॅक्सेस करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे एमअॉरेज डेस्कटॉप क्लाएंट इन्स्टॉल करावा लागेल.

तेव्हा, यापैकी एखादे अॅप्लीकेशन वापरून पाहा आणि ब्लॅकबेरीचा अनुभव घ्या!

Related Posts :



2 comments »

  • Amit Tekale said:  

    Thank you Ravi...Keep Reading for more...