,

रिफ्रेशिंग पिक्स व्ह्यूअर

July 21, 2008 Leave a Comment


फ्रेश न्यू फॉंट्सची माहिती घेतल्यानंतर या आठवड्याची सुरवात आपण एका रिफ्रेशिंग साईटने करणार आहोत. स्वतःचे फोटो काढण्याची आपल्यापैकी अनेकांना (विशेषतः मुलींना) आवड असेल. असे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पोझमध्ये काढलेले फोटो आपण फ्लिकर किंवा इतर तत्सम साईट्सवर वेळोवेळी अपलोडही करत असतो. यातील बहुतांश फोटो इतरांना पाहण्यासाठी आपण खुले ठेवतो. त्याच ठराविक साच्यात फोटो पाहणे कालांतराने कंटाळवाणे वाटू लागते आणि मग आपण फोटो अपलोड करायचा आणि पाहायचा कंटाळा करू लागतो. अशावेळी पिक्स व्ह्यूअरचा एक्स्पीरियंस घेतलाच पाहिजे.

पिक्स व्ह्यूअर ही एक मोफत अॉनलाईन सेवा आहे. याद्वारे तुमच्या फ्लिकरवरील फोटोंना स्लाईडशोमध्ये कन्व्हर्ट करण्याचे काम केले जाते. हे स्लाईडशो सात भिन्न आणि रिफ्रेशिंग फॉरमॅटमध्ये पाहता येतात. पिक्स व्ह्यूअर लॉंच होऊन केवळ तीन-चार महिने झाले असल्याने सध्या केवळ सात टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. जसजशी ही सेवा पॉप्युलर होत जाईल, तशी यातील टेम्प्लेट्सची संख्या वाढेल. सध्या tiltviewer (मस्त!), polaroid, dfgallery, flashapi, slide, grey, dark आणि pictobrowser ही टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही फोटोची क्वालिटी एसडी (Standard Definition) किंवा एचडी (High Definition) अशी स्पेसिफाय करू शकता. आणखी एक विशेष बाब म्हणजे, ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. तुमचे फ्लिकरचे यूजरनेम वापरून तुम्ही तुमचे फोटो पिक्स व्ह्यूअरमधून पाहू शकता. उदा. www.picsviewr.com/photos/username हा फॉरमॅट वापरून तुम्ही पिक्स व्ह्यूअरचा आनंद घेऊ शकता. या पद्धतीने अॅक्सेस करताना काही अडचण आल्यास फ्लिकरवर लॉग-इन होऊन फोटोस्ट्रीमवर क्लिक करा. त्यानंतर लिंकमधील फोटोस्ट्रीमचा आयडी कॉपी करून यूजरनेमच्या ठिकाणी वापरा.

पिक्स व्ह्यूअरचा आनंद घेण्यासाठी तुमचे फ्लिकरचे यूजरनेम पुढे दिलेल्या बॉक्समध्ये एंटर कराः


http://www.flickr.com/photos/

Direct url: www.picsviewr.com/photos/username



Related Posts :



0 comments »