, ,

फेव्ह-आयकॉनः साईट आणि ब्लॉगसाठी

July 22, 2008 Leave a Comment

गुगल किंवा याहू! आपण केवळ लेटरिंग किंवा लोगोवरून ओळखू शकतो. म्हणजे गुगलमधील केवळ G हे लेटर दाखवले तरी आपण ओळखू शकू की हे गुगलचे G आहे. आपल्या साईटसाठी एक आयडेंटिटी तयार झालीये, याचे हे उदाहरण. लोकांनी आपला ब्लॉग लक्षात ठेवावा किंवा आपली साईट चटकन ओळखावी यासाठी जवळपास सर्वच जण ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये दिसेल असा छोटासा आयकॉन तयार करतात. याला फेव्ह-आयकॉन किंवा फेव्हरेट आयकॉन असे म्हणतात. फेव्ह-आयकॉन तयार करणे आणि तो आपल्या साईट किंवा ब्लॉगवर अॅड करणे अत्यंत सोपे काम आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आज या पोस्टमध्ये घेऊ.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचा नवा फेव्ह-आयकॉनतुम्ही आर्टिस्ट किंवा डिझायनर असाल तर तुम्हाला हवा तसा आयकॉन फोटोशॉपमध्ये तयार करा किंवा कागदावर ड्रॉ करून स्कॅन करा. स्कॅनिंगची सुविधा नसेल तर फोटो काढून थेट वापरू शकता. फेव्ह-आयकॉनसाठी १६ बाय १६ पिक्सेल ही स्टॅंडर्ड साईझ आहे. १६ बाय १६ मध्ये क्रिएटिव्हिटी दाखवणं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या आकारात इमेज तयार करून नंतर रिसाईज करू शकता. ही इमेज PNG, GIF किंवा ICO यापैकी एका फॉरमॅटमध्ये असायला हवी. इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये PNG आणि GIF फॉरमॅटमधील फेव्ह-आयकॉन्स डिस्प्ले होण्यात अडचणी येतात. त्यामुळे आयकॉन्ससाठी असलेला ICO हा स्टॅंडर्ड फॉरमॅटंच वापरावा. फोटोशॉपमध्ये ICO फॉरमॅट ओपन करण्यासाठी एका प्लग-इनची गरज भासेल. ते प्लग-इन येथून डाऊनलोड करावे.
तुमच्याकडे फोटोशॉप नसेल तर फेव्ह-आयकॉन डॉट सीसी या साईटवर जाऊन तुम्ही पाच-दहा मिनिटांत तुमच्या साईट किंवा ब्लॉगसाठी फेव्ह-आयकॉन तयार करू शकाल. यावर १६ बाय १६ पिक्सेल्सचा कॅनव्हास आहे. त्यात तुम्ही हवा तसा आयकॉन तयार करू शकता. डाऊनलोड म्हटल्यानंतर तुम्ही तयार केलेला आयकॉन थेट ICO फॉरमॅटमध्येच सेव्ह होतो. एकदा का तुम्ही आयकॉनची फाईल तयार केली की ती साईट किंवा ब्लॉगवर अपलोड करणे बाकी राहते.

साईटवर फेव्ह-आयकॉन अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तयार केलेला फेव्ह-आयकॉन Favicon.ico या नावाने सेव्ह करा. ही फाईल तुमच्या साईटच्या सरव्हरवरील रूट डिरेक्टरीत प्लेस करा. लक्षात ठेवाः ज्या डिरेक्टरीत index फाईल आहे, त्याच डिरेक्टरीत ही फाईल असली पाहिजे. पॉप्युलर ब्राऊजर्स Favicon.ico ही फाईल शोधून अॅड्रेसबार शेजारी डिस्प्ले करतात. बरेच ब्राऊजर्स HTML कोडमध्ये सर्च करतात. त्यासाठी खालील कोड साईटमधील प्रत्येक पेजच्या हेडमध्ये () इन्सर्ट करावा.


तुम्ही PNG किंवा GIF फॉरमॅट वापरणार असाल तर खालील कोड हेडमध्ये प्लेस करावा.
or


ब्लॉगमध्ये फेव्ह-आयकॉन अॅड करण्यासाठी सर्वप्रथम फेव्ह-आयकॉन फाईल एखाद्या साईटवर होस्ट करावी लागेल. त्यासाठी गुगल पेजेस वापरणे सोपा मार्ग आहे. गुगल पेजेसमध्ये उजव्या नेव्हीगेशन पॅनेलमध्ये जाऊन तुमचा फेव्ह-आयकॉन अपलोड करावा. त्यानंतर राईट-क्लिक करून लिंक लोकेशन कॉपी करा. आता ब्लॉगरमध्ये Template > Edit HTML येथे जाऊन Expand widget template यावर चेक करा. आता CTRL + F करून त्यात टॅग सर्च करा. HTML टेम्प्लेटमध्ये नंतर पुढील कोड पेस्ट करा:

<link href='URL of your icon file' rel='shortcut icon'/>


या कोडमध्ये लाल रंगात लिहिलेल्या URL of your icon file च्या जागी गुगल पेजेसवर तुम्ही अपलोड केलेल्या फेव्ह-आयकॉनची लिंक पेस्ट करा. टेम्प्लेट सेव्ह करा. ब्लॉग रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला अॅड्रेसबार शेजारी तुमचा फेव्ह-आयकॉन दिसेल.

Related Posts :2 comments »

  • Manish said:  

    ह्याला फेव्ह-आयकॉन (फेव्हरिट आयकॉन)असे म्हणतात...फेव्हिकॉन नाही. तसे जुने (२००१) फिचर आहे हे...MSIE ने आणले, आणि नंतर इतर ब्राउसर्सनी...

  • Amit Tekale said:  

    Thanks Manish.
    The changes are made. Thank you for your feedback.