,

बहुपयोगी पेन्सिल बटन!

July 24, 2008 Leave a Comment


तुम्ही नोकियाचा हॅंडसेट वापरत असाल आणि तुमच्या हॅंडसेटवर एक छोटासे पेन्सिल अायकॉन असलेले बटन असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. मला सांगा, हा बटन तुम्ही कधी वापरले आहे? वापरले असेल तर कशासाठी? बऱ्याच जणांना हे बटन कशासाठी दिले आहे, हेच मुळी माहित नसते.पण, हे अनावश्यक वाटणारे बटन बहुपयोगी आहे. कसे ते पाहा.


पेन्सिल या आयकॉनवरून हे बटन रायटिंग मोडमध्ये (म्हणजे मेसेज टाईप करताना, ई-मेल लिहिताना, कॉन्टॅक्ट अॅड किंवा एडिट करताना वगैरे) कामास येते हे स्पष्ट होते. तुम्ही रायटिंग मोडमध्ये असताना हे बटन प्रेस केले की खालील मेनू पॉप अप होतोः
# Dictionary on
# Number mode
# Paste
# Insert symbol
# Writing language

रायटिंग मोडमध्ये या पाच गोष्टी सतत लागतात. त्यामुळे हा शॉर्टकट दिलेला आहे. टी९ मोड अॉन/अॉफ करण्यासाठी डिक्शनरी, नंबर इनपुट करण्यासाठी नंबर, स्पेशल सिंबॉल अॅड करण्यासाठी इन्सर्ट सिंबॉल आणि इतर भाषेत (उदा. हिंदी, मराठी) लिहिण्यासाठी रायटिंग लॅंग्वेज हे अॉप्शन्स उपयोगी ठरतात. पण यातील सर्वाधिक उपयोगास येणारा अॉप्शन म्हणजे कॉपी-पेस्टचा! हा अॉप्शन वापरायचा कसा ते आपण एका उदाहरणाने पाहू. समजा, तुम्ही एखादा मेसेज टाईप करत आहात. त्यातील काही भाग तुम्हाला कॉपी करून त्यात मेसेजमध्ये किंवा इतर कुठे (दुसऱ्या डॉक्युमेंट किंवा अॅप्लीकेशनमध्ये) पेस्ट करायचा आहे.
१. सर्वप्रथम पेन्सिल बटन दाबून स्क्रोल की डावीकडे किंवा उजवीकडे सरकवून हवे ते टेक्स्ट सिलेक्ट करा.
२. हे करत असताना तुम्हाला “Copy” आणि “Paste” असे अॉप्शन्स तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागतील.
३. कॉपीवर क्लिक करून पुन्हा पेन्सिल बटन प्रेस करा. तुम्हाला जिथे टेक्स्ट पेस्ट करायचे आहे तेथे किंवा दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये कर्सर न्या व पेस्टवर क्लिक करा.

Related Posts :0 comments »