लांबच...लांब, पसरलेला डेस्कटॉप!
शैलेश एक नंबरचा आळशी. त्याची अॉफिस बॅग म्हणजे अक्षरशः पोतं. कोणे एके काळी भरलेल्या वस्तू त्यात अाजही तशाच पडलेल्या असतील. पण या महाशयांना ती बॅग साफ करायला वेळ कधीच मिळत नाही. परवा मेल चेक करण्यासाठी त्याच्या डेस्कटॉपवर लॉग इन झालो आणि चूक केली असं पुढच्याच क्षणाला लक्षात आलं. अख्ख्या डेस्कटॉपवर विविध आयकॉन्सची रांगोळी होती. वॉलपेपर ठेवण्याची गरजच नव्हती, असं त्यावरून वाटत होतं. क्षणभर वाटलं, हा माणूस सगळा डेटा डेस्कटॉपवरंच ठेवतो की काय? शैलेशला डेटा ठेवण्यासाठी १७ इंची डेस्कटॉप पुरेनासा झाला होता. डेस्कटॉपवर फाईल्सची रांगोळी काढण्यापेक्षा याच्या डेस्कटॉपचा कॅनव्हासंच मोठा केला तर? होय. ३६०डेस्कटॉप या अॅप्लीकेशनद्वारे तुम्ही तुमचा डेस्कटॉप स्पेस वाढवू शकता.
वेब आणि डेस्कटॉपचे अद्भुत कॉन्व्हर्जन्स म्हणजे ३६०डेस्कटॉप. संस्थापक इव्हान जोन्स यांनी मेलबर्नमध्ये (अॉस्ट्रेलिया) २००५ चा हा प्रोजेक्ट सुरू केला. भारतात तिरुवनंतपुरम येथेही या कंपनीचे डेव्हलपमेंट सेंटर आहे.
गेल्या वषर्षी सप्टेंबरमध्ये पब्लिक बीटा लॉंच केल्यानंतर आता कंपनीने मार्केंटिंगसाठीचे प्रयत्न सुरू केले आहे. ३६०डेस्कटॉप म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कल्पना करा, की तुमच्या डेस्कटॉपवर मुंबई शहराची स्कायलाईन दाखवणारा वॉलपेपर आहे. आता यातील केवळ मरीन ड्राईव्ह काही भाग तुमच्या समोर दिसतोय. तुम्ही हा डाव्या बाजूस सरकवला तर, त्यापुढचा आणखी काही भाग दिसेल. अजून डावीकडे सरकवला तर आणखी पुढचा भाग दिसेल. एरवी आपल्यासाठी डेस्कटॉप म्हणजे एका वॉलपेपरएवढीच जागा. पण ३६०डेस्कटॉप या अॅप्लीकेशनमुळे तुमचा डेस्कटॉप एका वर्तुळात कन्व्हर्ट होतो. आणि तुमच्यासाठी नेहमीपेक्षा कित्येक पटीने अधिक जागा उपलब्ध होते. म्हणजे, शैलेशसारखी व्यक्ती डेस्कटॉपवरील फाईल्स थोड्या पसरून ठेवू शकेल.
३६० डेस्कटॉपने खास पॅनोरमिक वॉलपेपर्स तयार केले आहेत. ते डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता. ३६०डेस्कटॉप हे अॅप्लीकेशन सध्या केवळ विंडोज एक्सपी आणि विंडोज व्हिस्टासाठी उपलब्ध आहे. ३६०डेस्कटॉप इन्स्टॉल केल्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागात उजव्या कोपऱ्यात नेव्हिगेशन कंट्रोल उपलब्ध होते. त्यातून किंवा स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस माऊस नेऊन तुम्ही डेस्कटॉप स्क्रोल करू शकाल. ३६०डेस्कटॉपवर विविध गॅजेट्स आणि विजेट्स ठेवता येतात. हे अॅप्लीकेशन मोफत असून याचे बिझनेस मॉडेल डेस्कटॉपवरील जाहिरातींमध्ये दडलेले आहे. घाबरू नका...तुमच्या डेस्कटॉपवर नको असलेल्या पॉप-अप अॅड्स येणार नाहीत. ३६० डेस्कटॉपप्रमाणेच त्यातील जाहिरातीसुद्धा नावीन्यपूर्ण आहेत.
३६० डेस्कटॉप कसे दिसते, त्यातील जाहिराती कशा आहेत, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
३६० डेस्कटॉप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या टिप्स फारच उपयुक्त असतात. आणि मराठीतुन असल्यामुळे त्याचे जास्त महत्व आहे.
आपल्याला विशिष्ट ठिकाणाहुन आलेल्या मेल्स अँटोमँतीकली त्या त्या फोल्डरमध्ये पाठ्वता येतात का?
योगी,
साधी-सोपी टेक्नॉलॉजीचा तुम्हाला उपयोग होतोय, याचा आनंद आहे. तुम्हाला अाणखी नवी माहिती देण्याचे माझे प्रयत्न नक्कीच सुरू राहतील.
तुम्ही विशिष्ट ठिकाणाहून आलेले मेल विशिष्ट फोल्डरमध्ये पाठवू शकता. त्यासाठी मेल सेटिंग्जमध्ये तुम्हाला फिल्टर्स लावावे लागतील. म्हणजे एखाद्या विशिष्ट मेल अॅड्रेसवरून, किंवा एखादे विशिष्ट नाव असलेले किंवा एखादा विशिष्ट शब्द नसलेले मेल या फोल्डरमध्ये साठवावेत, असे फिल्टर्स तुम्ही लावू शकता.
धन्यवाद.
अमित टेकाळे.