ई-कॅल्सीः अॉनलाईन सायंटिफिक कॅल्क्युलेटर
विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणारे एखादे झटपट कॅल्क्युलेशन करायचे असेल तर रन वर क्लिक करून Calc अथर्थात कॅल्क्युलेटर असं टाईप करतात आणि कॅल्क्युलेटरचे अॅप्लीकेशन रन होते. ज्यांना रन वापरण्याची तितकीशी सवय नाही ते लोक प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज येथून कॅल्क्युलेटर अॅक्सेस करतात. मॅकिन्तोश वापरणारे डॅशबोर्डमधून कॅल्क्युलेटर अॅक्सेस करू शकतात. पण हे कॅल्क्युलेटर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी आदी बेसिक अॉपरेशन्ससाठीच उपयोगाला येतात. याद्वारे सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स शक्य होत नाहीत. इंजिनिअरिंगचे विद्याथर्थी किंवा इंजिनिअर्सना छोट्या-मोठ्या कॅल्क्युलेशन्ससाठीही सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स लागते. अशांसाठी ई-कॅल्सी हे अॉनलाईन कॅल्क्युलेटर हा सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे.
ई-कॅल्सीद्वारे बेसिक आणि सायंटिफिक अशी दोन्ही प्रकारची कॅल्क्युलेशन्स करता येतात. बेसिक कॅल्क्युलेटरचा वापर करून नेहमीच्या कॅल्क्युलेशन्स व्यतिरिक्त वर्ग, वर्गमूळ काढता येणे शक्य होते. सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा वापर सर्व प्रकारचे सायंटिफिक फंक्शन्स आणि अलजेब्रिक इक्वेशन्स सोडवण्यासाठी करता येतो. यात युनिट कन्व्हर्टरची सुविधा देण्यात आली आहे. ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल करताना किंवा एखादी असाईनमेंट पूर्ण करताना आता कॅल्क्युलेटर शोधण्याची गरज नाही. तुम्ही अॉनलाईनदेखील कॅल्क्युलेशन्स करू शकता!
आणखी एका अॉनलाईन कॅल्क्युलेटरच्या माहितीसाठी वाचाः अचूक कॅल्क्युलेशन!
0 comments »
Post a Comment