गुप्त संदेशांसाठी...
आजच्या इंटरनेट युगात माहितीला सवर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. माहिती शोधण्यासाठी आणि माहितीच्या देवाण-घेवाणीसाठीच इंटरनेटचा प्रामुख्याने वापर केला जातो. आपल्याकडे असणारी बहुमूल्य माहिती इतरांपासून सुरक्षित कशी ठेवता येईल, यासाठी सतत संशोधन सुरू आहे. सरकार, मोठ्या कंपन्या, वित्तीय संस्था आदींसाठी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाची असते. अशा सिक्युरिटी सेवांमध्ये डेटा एन्क्रिप्शन टेक्निक्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. तुम्ही म्हणाल, आम्हाला काय उपयोग याचा? उपयोग आहे. आपणही एकमेकांना अनेकदा महत्त्वाचे किंवा गोपनीय मेसेजेस पाठवत असतो. अशा वेळी सदर माहिती इतरांच्या हातास लागली तर अनर्थ घडू शकतो. त्यामुळे असे मेसेजेस एन्क्रिप्ट करून पाठवावेत. आपले मेसेजेस आणि फाईल्स एन्क्रिप्ट करून पाठविण्यासाठी अनेक अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत.
एन्क्रिप्शनसाठी उपलब्ध असलेल्या बहुतांश सर्व अॉनलाईन सेवा मोफत आहेत. या सेवा वापरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनदेखील करावे लागत नाही. उपलब्ध सेवेतील मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला पाठवायचा असलेला मेसेज टाईप करून तो डिक्रिप्ट करण्यासाठी पासवर्ड तयार केल्यानंतर तुमचा मेसेज एन्क्रिप्ट होऊन त्याच मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले होईल. आता हा एन्क्रिप्टेड मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीस पाठवू शकता. ज्या सेवेचा वापर करून मेसेज एन्क्रिप्ट केला आहे त्याच सेवेचा वापर करून तो डिक्रिप्ट करावा लागेल. डिक्रिप्शनसाठी वापरावा लागणारा पासवर्ड मात्र एन्क्रिप्टेड मेसेजसोबत पाठवू नये. पासवर्ड पाठविण्यासाठी तुम्ही एसएमएस किंवा फोन कॉलचा वापर करू शकता. मेसेजेस एन्क्रिप्ट करण्यासाठी तुम्ही एनकोडर किंवा इन्फोएन्क्रिप्ट या सेवा वापरू शकता. एनकोडरमध्ये ४०० शब्दांची मयर्यादा आहे.
मेसेजसप्रमाणे एखादी फाईलही तुम्ही एन्क्रिप्ट करून पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. यासाठी अॉनलाईन आणि अॉफलाईन सेवाही उपलब्ध आहेत. अॉनलाईन फाईल एन्क्रिप्शनसाठी फाईल एन्क्रिप्टर, तर अॉफलाईन एन्क्रिप्शनसाठी ट्रूक्रिप्ट हे अॅप्लीकेशन वापरू शकता. विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा, मॅकिन्तोश आणि लिनक्स अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी ट्रूक्रिप्ट येथून डाऊनलोड करावे.
0 comments »
Post a Comment