फ्रेश न्यू Fawnt!

July 19, 2008 Leave a Comment


तुम्हाला वर्डमध्ये किंवा इतर कोणत्याही टेक्स्ट प्रोसेसरमध्ये काम करावे लागत असेल किंवा तुमचा जॉब डिझायनिंगशी संबंधित असेल तर फॉंट्स हा तुमचा जिव्हाळ्याचा विषय असणार. एखादे डॉक्युमेंट तयार करताना एक किंवा दोनच फॉंट्स वापरावेत असा सल्ला दिला जातो. पण काही वेळा त्याच-त्या फॉंट्सचा कंटाळा येतो किंवा एखादा विषय असा असतो की त्यासाठी नेहमी वापरले जाणारे टाईम्स न्यू रोमन किंवा एरियल हे फॉंट्स सूट होत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या सिस्टिममध्ये उपलब्ध असलेले फॉंट्स ट्राय करतो. पण त्यापैकी एकही सूट होत नाही. आता काय करणार?

ज्या-ज्या इंडस्ट्रीत फॉंट्स लागतात (उदा. पब्लीशिंग, ब्रॉडकास्टिंग, अॅडव्हर्टायझिंग इ.) त्या एकतर फॉंट तयार करतात किंवा अॉनलाईन विकत घेतात. फॉंट विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे फॉंट ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही, हे तुमच्या लक्षात आले असेल. पण Fawnt या साईटवरून तुम्ही अगदी नवे, ताजे आणि डिसेंट फॉंट्स डाऊनलोड करू शकता - तेही अगदी मोफत. मोफत फॉंट देणाऱ्या इतरही काही साईट्सच्या तुलनेत Fawnt चा इंटरफेस अत्यंत क्लीन आहे.

Fawnt वर तुमच्यासाठी तब्बल दहा हजार (१०,०००) फॉंट्स उपलब्ध अाहेत. यावरील फॉंट्स ओपन टाईप (otf) असल्यामुळे विंडोज आणि मॅकिन्तोशसाठीही वापरता येतात. फॉंट डाऊनलोड केल्यानंतर तो तुमच्या फॉंट डिरेक्टरीत सेव्ह करणे आवश्यक आहेत. त्यानंतरच तुम्ही तो अॅप्लीकेशन्समध्ये वापरू शकाल.

Related Posts :



0 comments »