,

टेक्स्ट सेव्हर, टाईम सेव्हर

July 18, 2008 Leave a Comment

एखाद्या मेलला उत्तर देताना किंवा एखाद्या ब्लॉगपोस्टवर कॉमेंट देताना आपण इतकं गुंग होतो की आपण किती लिहितोय याचं भान राहत नाही. सगळं लिहून झाल्यानंतर (पुन्हा एकदा वाचून, करेक्शन्स करून) आपण सेन्ड किंवा पोस्ट म्हणतो आणि...सेशन एक्स्पायर्ड किंवा सेशन टाईमआऊट असा भलो मोठा मेसेज येतो. झालं...एवढा विचार करून, एवढा वेळ घालून लिहिलेलं सगळं गेलं...ते परत मिळवण्याच्या प्रयत्नात डेस्परेट होऊन आपण भलत्या कोणत्यातरी कीज प्रेस करून होतं-नव्हतं तेही घालवतो. आता परत तेच लिहिण्याचा मूड राहत नाही किंवा लिहिलंच तर ते मनासारखं होत नाही. तुम्ही फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल, तर अशा प्रसंगी गेलेले टेक्स्ट परत मिळविण्यासाठी एक नवे एक्स्टेंशन वापरू शकता.

टेक्स्ट सेव्हर हे त्या एक्स्टेंशनचे नाव. टेक्स्ट सेव्हर इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करा. आता तुम्ही टेक्स्ट सेव्हर वापरू शकाल. फायरफॉक्सच्या स्टेटसबारमध्ये (तळात) पेपर आणि फ्लॉपी असा आयकॉन दिसेल. हा टेक्स्ट सेव्हरचा आयकॉन आहे. कोणत्याही साईटवरील टेक्स्ट एरियात टाईप करताना तुम्ही लिहिलेल्या मजकुरावर जाऊन राईट-क्लिक करा व Add this text to TextSaver यावर क्लिक करा. तुम्ही टाईप करत असलेले सर्व टेक्स्ट आता टेक्स्ट सेव्हरमध्ये सुरक्षित आहे. टेक्स्ट अॅड झाल्यानंतर साईडबार तयार होईल. त्यासोबतच एक बॉक्स प्रॉम्प्ट होईल. यात तुम्ही नुकतेच अॅड केलेल्या टेक्स्टसाठी एखादा कीवर्ड देऊ शकता. सेव्ह केलेले टेक्स्ट पुन्हा शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही काम करत असताना सेशन टाईमआऊट झाले किंवा कनेक्टिव्हिटी गेली तर टेक्स्ट सेव्हर ओपन करून सेव्ह केलेले टेक्स्ट रिट्राईव्ह करू शकता.

हे टेक्स्ट तुम्ही ड्रॅग करून पुन्हा वापरू शकता. टेक्स्ट सेव्हर अजूनही प्रायोगिक अवस्थेत असल्यामुळे ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला मोझिलावर रजिस्टर व्हावे लागेल. पण हे अगदी दोन मिनिटांचे काम आहे.
मोझिलावर रजिस्टर होण्यासाठी येथे क्लिक करा.
टेक्स्ट सेव्हर इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
आणखी एका भन्नाट एक्स्टेंशनसाठी वाचाः शब्द खाली पडू न देणारे ‘हायपरवड्‌र्ड्स’

Related Posts :0 comments »