,

व्हेरी ब्राईट ‘डिमडिम’...

August 6, 2008 Leave a Comment



सॉफ्टवेअर क्षेत्रात भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहेच, आता भारतीय इंजिनिअर्स वेब २.० मध्येही (नव्या युगातील इंटरनेट क्रांती - असे याचे वर्णन करता येऊ शकते) नावीन्यपूर्ण कल्पना आणून आपला ठसा उमटवत आहेत. कालच्या पोस्टमध्ये तुम्ही वीगो या आगळ्यावेगळ्या सेवेबद्दल वाचलेच असेल. भारतीय असलेल्या डी. डी. गांगुली, प्रकाश खोत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गेल्या वषर्षी लॉंच केलेल्या ‘डिमडिम’ या अॉनलाईन वेब कॉन्फरन्सिंग सेवेबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

गांगुली आणि खोत यांनी सुमारे १२ वषर्षांच्या अनुभवानंतर २००६ मध्ये ‘डिमडिम’ प्रोजक्टवर काम सुरू केलं होतं. गेल्या वषर्षी अॉक्टोबरमध्ये त्यांनी ‘डिमडिम’ ही जगातील पहिली अोपन सोर्स वेब कॉन्फरन्सिंग सेवा सुरू केली. या क्षेत्रात प्रचलित असलेल्या गोटूमिटींग आणि वेबएक्ससारख्या सेवांच्या स्पर्धेत ‘डिमडिम’ थेट उतरले आहे. जगभरातील सुमारे सव्वा लाख लहान-मोठ्या कंपन्या आज ‘डिमडिम’ची सेवा वापरत आहेत. आता तुम्ही म्हणाल, स्काईप आणि जी-टॉक असताना ‘डिमडिम’ पाहिजे कशाला? डॉक्युमेंट्स शेअर करायचे झाले तर गुगल डॉक्स वापरू शकतो. पण या सगळ्या सेवांचे इंटिग्रेशन म्हणजे ‘डिमडिम’. शिवाय ‘डिमडिम’वरून वेब कॉन्फरन्सिंग करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागत नाही. अगदी पाच मिनिटांत ‘डिमडिम’वर रजिस्ट्रेशन करून वेब कॉन्फरन्सिंग सुरू करता येते. काही मयर्यांदासह ‘डिमडिम’चे बेसिक व्हर्जन मोफत वापरता येते. लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांची गरज एवढ्यावर पूर्ण होऊ शकते. अॅडव्हान्स्ड फीचर्ससाठी ठराविक रक्कम भरून एंटरप्राईझ एडिशन तुम्ही विकत घेऊ शकता.

Schedule a Conference


Actual Conference on Dimdim



‘डिमडिम’चा वापर करून कॉन्फरन्स होस्ट करणाऱ्यास प्रेझेंटर असे म्हटले जाते. या प्रेझेंटरकडे कॉन्फरन्ससंदर्भातील सर्व हक्क असतात. म्हणजे यात कोण सहभागी होणार, कॉन्फरन्स किती वेळ चालणार वगैरे. इतरांना कॉन्फरन्समध्ये सामावून घेण्यासाठी एका विशिष्ट लिंकवर क्लिक करावे लागते. ही लिंक आपण त्यांना ई-मेलने पाठवू शकतो. कॉन्फरन्स सुरू असताना सर्व सभासद एकमेकांशी चॅट करू शकतात, डॉक्युमेंट्स आणि डेस्कटॉपही शेअर करू शकतात. म्हणजे मी माझ्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन रन करून तो इतर सवर्वांना दाखवू शकतो.
(सेवाविस्तारासाठी ‘डिमडिम’ला नुकतेच ६ मिलियन डॉलर्स मिळाले असून आता आणखी नव्या सेवांची अपेक्षा करण्यास हरकत नाही)

बेसिक व्हर्जनची वैशिष्ट्येः
-एकावेळी २० जणांशी कॉन्फरन्स
-अॉडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा दोन्ही सेवा उपलब्ध
-पाच तासांपर्यंत सलग कॉन्फरन्सिंग शक्य
-चॅट, स्क्रीनकास्ट, व्हाईटबोर्डसारख्या व्हॅल्यू अॅडेड सेवा

Related Posts :



0 comments »