,

पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्टर

August 7, 2008 Leave a Comment

एखाद्या विशिष्ट विषयावर सर्च करत असताना आपण अनेक वेगवेगळ्या फॉरमॅटमधील फाईल्स डाऊनलोड करत असतो. म्हणजे काही माहिती आपण थेट वेबसाईटवरून घेतो. काही माहितीसाठी वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स डाऊनलोड करतो. काही वेळा पीडीएफ फाईल्सही डाऊनलोड करतो. आता नेमकी या पीडीएफ फाईलमधील एखादी इमेज आपल्याला कुठेतरी वापरण्यासाठी हवी असते. बोंबला...आता आली का पंचाईत? ही इमेज कशी मिळवायची?


मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल किंवा पॉवपॉईंट यातील एखादी इमेज तुम्हाला मूळ स्वरूपात हवी असल्यास ती फाईल सेव्ह अॅज एचटीएमएल करा. तुम्ही जिथे फाईल सेव्ह कराल तिथे एका एचटीएमएल फाईलसह एक नवे फोल्डर तयार होईल. त्यात तुम्हाला हव्या असलेल्या इमेजेस मूळ स्वरूपात (.jpg, .gif वगैरे) सेव्ह झालेल्या असतील. आता प्रश्न उरतो तो पीडीएफ फाईल्सचा. पीडीएफमधील इमेजेस मूळ स्वरूपात कशा मिळवता येतील? वरील पद्धतीने इमेजेस मिळवता येतील. पण त्यासाठी तुमच्याकडे अॅडोब अक्रोबॅट असायला हवे. अॅडोब अॅक्रोबॅटची तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही आणखी एका मार्गाने पीडीएफ फाईलमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.



सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट नावाचे एक छोटेसे अॅप्लीकेशन वापरून तुम्ही पीडीएफ फाईलमध्ये असलेल्या TIF, JPEG, BMP, GIF, PNG, TGA, PBM, PPM, PCX या फॉरमॅटमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.
एवढेच नव्हे तर हे अॅप्लीकेशन वापरून एनक्रिप्ट केलेल्या पीडीएफ फाईल्समधील इमेजेसही तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट विंडोज एनटी/२०००/एक्सपी/२००३ आणि व्हिस्टालाही सपोर्ट करते.

सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :