,

फसवणूक जी-मेलची!

August 10, 2008 Leave a Comment

आजकाल बहुतांश जण जी-मेल वापरतात. जी-मेलमधील सोयी-सुविधांमुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. सोपा आणि सुटसुटीत इंटरफेस, चॅटिंग, पुश मेल (POP3/IMAP), मेल मर्ज अशा अनेक सुविधांमुळे अनेक लोक जी-मेलवर शिफ्ट झाले. त्यासमोर इतर अकाऊंट्स खरोखर फिके पडले. जी-मेलमध्ये कमीत कमी स्पॅम मेल्स येतात आणि जे काही येतात तेही फिल्टर होऊन थेट स्पॅम फोल्डरमध्ये जातात. त्यामुळे वेळेची बचत होते. एवढी सगळी फीचर्स असली तरी एक सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने एक्झिक्युटेबल अर्थात .EXE फाईल्स पाठविण्याची सोय जी-मेलमध्ये ठेवलेली नाही. पण एक अगदी सोपी ट्रिक वापरून तुम्ही हेही करू शकता...

.EXE फाईल .ZIP करून पाठवली तर? पण जी-मेल तेवढे इंटेलिजंट नक्कीच आहे. .ZIP मध्ये .EXE असेल तरीदेखील आपल्याला ती फाईल जी-मेलमधून पाठविता येत नाही. अशा परिस्थितीत .EXE फाईल पाठविण्यासाठी केवळ एक्स्टेंशन बदलावे. उदा. तुम्हाला xyz.exe ही फाईल पाठवायची आहे. .EXE असल्यामुळे जी-मेल ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून अॅक्सेप्ट करणार नाही. अशा वेळी .EXE च्या एेवजी .doc किंवा .exx किंवा कोणतेही रॅंडम एक्स्टेंशन द्या. म्हणजे हीच फाईल xyz.exx अशी होईल. आता तुम्ही ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून पाठवू शकता. रिसीव्ह करणाऱ्याने ही फाईल रिनेम करून एक्स्टेंशन पुन्हा .EXE करावे. अॅज सिंम्पल अॅज दॅट!Related Posts :8 comments »

 • Prakash Ghatpande said:  

  अमित टेकाळे
  आपण अत्यंत उपयुक्त लेखन करत आहात त्याबद्दल अभिनंदन व आभार.
  जी मेल मध्ये युनिकोड लेखन हे नेहमीच्या पत्त्यावर पाठवले तरी त्याच्या स्पॆम मध्ये जाते. त्याने पाहिले नाही तर ते डिलिट हौन जाते. अशा मुळे गैरसमज होण्याचा/ उपयुक्ततता कमी होण्याचा संभव असतो. स्पॆम डिलीट करताना नेहमी एक नजर त्यावर मारावी.

 • Amit Tekale said:  

  Dear Prakashji,
  Thanks for you kind feedback and one useful tip for sasotechnology readers.
  Keep reading for more.

 • manisham said:  

  farach chan mahiti milali.
  ashich mahiti det raha.

 • manisha said:  

  farach chan mahiti milali.
  ashich mahiti det raha.

 • Aniket Mehta said:  

  I came to this blog from Daily Sakal.
  Such a useful information.
  Thanks a lot
  :)

 • Amit Tekale said:  

  Dear Aniket,
  I am happy that you are getting useful information from this blog. Keep reading for more...

 • Anonymous said:  

  Khup Chhan Bhau.