,

िझझायनर ‘शब्दखेळ’!

August 12, 2008 Leave a Comment

अनेक वेबसाईट्स आणि ब्लॉग्जवर तुम्ही टॅग क्लाऊड पाहिले असेल ना? संबंधित साईट किंवा ब्लॉगवर एखाद्या विशिष्ट विषयावर अधिक लिखाण होत असेल तर त्या विषयाचे नाव मोठ्या, ठळक अक्षरांत दिसायला लागते. ज्या विषयावर कमी चचर्चा होत असेल त्याला दिलेला टॅग किंवा कीवर्ड लहान अक्षरांत िदसतो. अशा लहान-मोठ्या आकारांतील कीवर्ड्सच्या जाळ्यांस टॅग क्लाऊड म्हणतात. या टॅग क्लाऊडचा वापर केवळ साईट्स किंवा ब्लॉगसाठी होतो असे नाही. थोडे लॉजिक लावले तर याच संकल्पनेचा वापर इतर ठिकाणीही होऊ शकतो, हे वर्डल या सेवेने सिद्ध केले आहे. आजच्या पोस्टमध्ये वर्डलबद्दल अधिक माहिती घेऊया.Wordle is a toy for generating "word clouds" from text that you provide - असे या सेवेचे वर्णन केले आहे. एकदा वापरल्यानंतर अक्षरशः अॅडिक्ट करणारी ही सेवा आहे. वर्डल वापरून तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा साईटसाठी वर्ड क्लाऊड तयार करू शकता. यासाठी तुमच्या ब्लॉग किंवा साईटच्या आरएसएस फीडचे डिटेल्स लागतात. शिवाय तुम्ही वर्डल मध्ये थेट टाईप करूनही वर्ड क्लाऊड तयार करू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
- वर्डल डॉट नेटवर गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट अशी एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर टेक्स्ट अॅड करण्यासाठीचे विविध अॉप्शन्स दिसतील.
- सवर्वांत वर असलेल्या बॉक्समध्ये तुम्ही थेट टेक्स्ट अॅड करू शकता. तुम्ही अॅड केलेल्या टेक्स्टमध्ये जो शब्द सर्वाधिक वेळा आला असेल तो वर्ड क्लाऊडमध्ये मोठ्या अक्षरांत डिस्प्ले होईल. यात तुम्ही मराठीतही टाईप करू शकता.
- ब्लॉग किंवा साईटसाठी वर्ड क्लाऊड तयार करायचे असल्यास लिंक किंवा आरएसएस फीड एंटर करावे लागेल. तुम्ही तुमच्या डेलिशियस अकाऊंटसाठीदेखील टॅग क्लाऊड तयार करू शकता.
- टेक्स्ट एंटर करून गो किंवा सबमिट म्हटल्यानंतर सुंदर अशा रंगसंगतीमधील वर्ड क्लाऊड तुमच्यासमोर असेल.
- रॅंडमाईझ अॉप्शन वापरून तुम्ही अनेक वेगळ्या डिझाईन्समध्ये वर्ड क्लाऊड तयार करू शकता.
- तयार झालेले क्लाऊड इमेज फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्यावा लागेल. त्यानंतर पेंटब्रश किंवा फोटोशॉपमध्ये एडिट करू शकता.

वर्डल कशासाठी?
१. एखादा नवा विषय शिकवण्यापूर्वी त्यातील विविध संकल्पनांसाठी वर्ड क्लाऊड तयार करता येऊ शकतो. त्यातील एकेक संकल्पना नंतर क्रमाने समजावून सांगता येऊ शकते.
२. प्रेझेंटेशनसाठी उत्तम प्रकारे वर्ड क्लाऊड वापरता येऊ शकतो.
३. बिझनेस कार्ड तयार करण्यासाठीही वर्डलचा प्रभावीपणे वापर करता येतो.
४. प्रोजेक्टसाठी कव्हरपेज म्हणून वर्ड क्लाऊड वापरता येऊ शकेल

अशा अनेक पद्धतीने सवर्वांना वर्ड क्लाऊडचा उपयोग होऊ शकतो.

Image created using wordle.net


Related Posts :0 comments »