नावात तर सगळं आहे...

August 15, 2008 Leave a Comment



शैलेश नुकताच मलेशियाहून परतला होता. बिझनेसच्या निमित्ताने मलेशियाला गेलेल्या शैलेशने ब्रेक म्हणून मिळालेल्या दोन दिवसांत शक्य तितकी मुशाफिरी केली. पेट्रोनास टॉवर्स, केएल टॉवर, बाटू केव्ह्ज, गेन्तिंग हायलॅंड, बर्ड पार्कला व्हिजीट आणि मनसोक्त शॉपिंग - असा त्याचा दोन दिवसांचा प्रोग्राम होता. सोबत असलेल्या डिजीटल कॅमेऱ्याची मेमरी संपेपर्यंत फोटो काढले. घरी आल्यावर लॅपटॉपवर ते डाऊनलोड केले. शैलेश किती आळशी आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्याच्या लॅपटॉपवर कोकण सहल, माथेरान ट्रेक, कंपनीच्या नव्या अॉफिसचे भूमीपूजन, नंतर उद्घाटन, महेशच्या मुलीचा पहिला वाढदिवस, क्लाएंटची साईट, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, आणि मलेशिया अशा सगळ्या फोटोंच्या फोल्डर्सची अक्षरशः खिचडी झाली होती. फोल्डरला नाव दिले होते म्हणून फोटो कुठले ते कळत तरी होतं. आतील सगळ्या फोटोंचे फाईलनेम DSCN000376.JPG असे काहीसे होते. (DSCN म्हणजे Digital Still Capture Number). एकेक फोटो सिलेक्ट करून रिनेम करणं म्हणजे अशक्य होतं. अशावेळी लुपस रिनेम हे सॉफ्टवेअर वापरू शकतो.



लुपस रिनेम हे केवळ २५२ केबींचे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही बॅच रिनेम करू शकता. लुपस रिनेम ओपन केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवर असलेले कोणतेही फोल्डर किंवा फाईल तुम्ही त्यातून अॅक्सेस करू शकता. एखाद्या फोल्डरमधील फाईल्स रिनेम करायच्या झाल्यास त्या सर्व फाईल्स सिलेक्ट करून तुम्हाला हवे ते नाव द्या व रिनेम म्हणा. फाईल्स रिनेम करण्याबरोबरच फाईलमधील एखादे नाव रिप्लेस करायचे असेल तर तेही शक्य होते. शिवाय अॉटोनंबरिंग (म्हणजे DSCN0001 एेवजी Malaysia 1, Malaysia 2...), अप्पर केस, लोअर केस, एक्स्टेंशन एडिटिंग आदी गोष्टी करणेही शक्य होते. लुपस रिनेमचा आणखी एक फायदा म्हणजे यात अॅट्रिब्युट्स वापरूनही फाईलनेम चेंज करता येते. उदा. तुमच्याकडे असलेली एमपीथ्री गाणी विचित्र नावाने सेव्ह झालेली असल्यास अॅट्रिब्युट अर्थात फाईल क्रिएट करताना एंटर केलेली माहिती वापरून तुम्ही ती रिनेम करू शकता. म्हणजे तुमची गाणी चित्रपटाच्या, संगीतकाराच्या किंवा गीतकाराच्या नावाने रिनेम होऊ शकतील. फोटोंच्या बाबतीतही अॅट्रिब्युट बेस्ड रिनेमिंग शक्य आहे.

लुपस रिनेम विंडोज एक्स्पी आणि त्याअगोदरच्या व्हर्जन्ससाठी वापरता येऊ शकते.
लुपस रिनेम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »