,

आज लिहा, उद्या पाठवा...

August 16, 2008 Leave a Comment


केवळ एक ई-मेल करण्यासाठी तुम्हाला कधी अॉफिसमध्ये यावं लागलंय किंवा रात्री उशिरापर्यंत जागावं लागलंय? केवळ एका ई-मेलसाठी सुटीचा अख्खा दिवस वाया गेलाय? केवळ एक ई-मेल पाठवला नाही म्हणून नाही-नाही ते एेकावं लागलंय? एकच ई-मेल दहा वेळा रिमाईंडर म्हणून पाठवावा लागलाय? नसेल तर उत्तम, पण असेल तर...

जी-मेल, याहू, एमएसएन आदी प्रचलित मेल सेवा दररोज काहीतरी नवे फीचर इन्ट्रोड्यूस करत असतात. पण या सगळ्या सेवांनी एक महत्त्वाचे फीचर अजूनही अॅड केलेले नाही. हे फीचर म्हणजे शेड्यूल्ड मेल - अथर्थात ठराविक तारखेस व ठराविक वेळेस मेल पाठवण्याची सोय. तुम्ही ब्लॉगरची सेवा वापरत असाल तर तुम्हाला शेड्यूल्ड पोस्ट्सची सुविधा माहित असेल. अगदी त्याच पद्धतीने शेड्यूल्ड मेल सेवा सुरू करण्याची गरज आहे. जी-मेल, याहूने ही सेवा उपलब्ध करून दिलेली नसली तरी लेटर मी लॅटर ही सेवा वापरून तुम्ही मेल शेड्यूल करू शकता. लेटर मी लॅटर ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्टर व्हावे लागेल. त्यानंतर तुम्ही नेहमी वापरत असलेला ई-मेल अॅड्रेस देऊन लेटर मी लॅटरमधून हवा तो मेल शेड्यूल करू शकता.



तुम्ही ज्यांना ई-मेल पाठवणार आहात त्यांना तुमच्या नेहमीच्या ई-मेल अॅड्रेसवरूनच मेल आलेला दिसेल. त्यांनी केलेला रिप्लायही तुम्हाला नेहमीच्याच अॅड्रेसवर पाहता येईल. तुम्ही हा मेल शेड्यूल केला होता, हे ही त्यांना कळणार नाही. एखाद्या व्यक्तीस ठराविक काळानंतर आठवणीसाठी एकच मेल करायचा असेल तर तीही सुविधा यात आहे. लेटर मी लॅटर ही मेल सेवा नसल्याने यातून अॅटॅचमेंट्स पाठवत येत नाहीत.

Related Posts :



0 comments »