,

सर्च बाय डेट...

August 17, 2008 Leave a Comment

जी-मेल सर्चचा किती उपयोग होतो हे तुम्हाला एव्हाना लक्षात आलं असेलंच. जी-मेलद्वारे दिल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या स्पेसमुळे आपण शक्यतो मेल डिलीट करण्याच्या भानगडीत पडत नाही आणि त्यामुळे जुना मेल सर्च करण्यासाठी ढिगारा उपसावा लागतो. गुगलने मेल सर्च करण्यासाठी विविध सर्च अॉपरेटर्स दिले असले तरी ते लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी त्याचा वापर करणे शक्य होईल असे नसते. काही वेळा आपल्याला साधारण तारखेचा अंदाज असतो. त्यावेळी after:2008/5/11 before:2008/5/18 अशा ठराविक पद्धतीने सर्च देणे नाही म्हटले तरी कठीणच जाते. त्याएेवजी 'सर्च बाय डेट' असे एखादे बटन तयार केले तर?



ग्रीसमंकी स्क्रिप्ट वापरून सर्च बाय डेटचे स्वतंत्र बटन तयार करणे शक्य आहे. हे एक्स्टेंशन फायरफॉक्स वापरणाऱ्यांसाठी आहे. सर्वप्रथम ग्रीसमंकी स्क्रिप्ट इन्स्टॉल करा. आता Gmail Date Search User Script इन्स्टॉल करा. फायरफॉक्स रिस्टार्ट केल्यानंतर तुमच्या सर्च बॉक्ससमोर 'सर्च मेल' आणि 'सर्च द वेब'समोर 'सर्च बाय डेट' असे तिसरे बटन दिसू लागेल. आता तुम्ही केवळ तारीख (उदा. 5/11 किंवा 5/18) एंटर करून सर्च बाय डेटवर क्लिक करा. त्या तारखेला आलेले मेल डिस्प्ले होतील. वेळ वाचवण्यासाठी हे एक्स्टेंशन अत्यंत उपयोगी ठरते.

Related Posts :



0 comments »