, ,

व्हॅल्यू अॅडेड फाईल शेअरिंग

August 19, 2008 Leave a Comment


फाईल शेअरिंगसाठी आपण शक्यतो एफटीपी (फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल) वापरतो. पण एफटीपीचा वापर केवळ फाईल ट्रान्स्फर करणं शक्य होतं. शिवाय फाईल ट्रान्स्फर करण्यासाठी एफटीपी क्लाएंट लागतो, फाईल ट्रान्स्फर केल्यानंतर ई-मेल करून संबंधितांना सांगावं लागतं, फाईलसोबत काही मेसेजेस द्यायचे असतील तर ते देता येत नाहीत. थोडक्यात काय, तर एफटीपी म्हणजे राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस - अर्थात लाल डबा. फाईल ट्रान्स्फर शंभर टक्के होणार - पण मूल्यवर्धित सेवांशिवाय. मस्त एअरकंडिशन्ड वातावरणात चित्रपट आणि संगीताचा आस्वाद घेत, खड्ड्यांची काळजी न करता केलेला आणि तितकाच सुरक्षित प्रवास करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप आयओ ही नव्याने सुरू झालेली वापरायला हवी.

व्हॅल्यू अॅडेड अॅंड हॅसल फ्री फाईल ट्रान्स्फर किंवा फाईल ट्रान्स्फर २.० असे ड्रॉपआयओचे वर्णन करता येईल. तुम्ही म्हणाल की मी या सेवेची एवढी स्तुती का करतोय. वापरून पाहिल्यानंतर तुम्हीही माझ्या मताशी सहमत व्हाल, याची मला खात्री आहे. अगदी ४ सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही ड्रॉप आयओ वापरण्यास सुरूवात करू शकता. ड्रॉपआयओ तुमच्यासाठी एक स्वतंत्र स्पेस तयार करते. या स्पेसचा वापर करून तुम्ही फोटो, व्हिडीओ, अॉडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर सर्व प्रकारच्या फाईल्स स्टोअर करून शेअर करू शकता. या स्वतंत्र स्पेसला ड्रॉप असे नाव दिले आहे. एक व्यक्ती असे कितीही ड्रॉप्स तयार करू शकते. प्रत्येक ड्रॉपवर तुम्ही १०० एमबी एवढा डेटा स्टोअर करू शकता. ड्रॉप तयार केल्यानंतर त्या नावाने एक ई-मेल अॅड्रेस आणि फोन नंबर जनरेट केला जातो. त्यानंतर या ई-मेल अॅड्रेस आणि फोनचा वापर करून तुम्ही नव्या फाईल्स अपलोड करू शकता. ड्रॉपआयओचा वापर करून तुम्ही फॅक्स पाठवू आणि मिळवू शकता.ड्रॉपआयओच्या माध्यमातून तुम्ही इतरांसोबत तुमचा ड्रॉप शेअर करू शकता आणि संबंधित व्यक्तींना त्याच ड्रॉपमध्ये फाईल अॅड करण्याची परवानगीदेखील देऊ शकता. तुमच्या ड्रॉपवर एखादी नवी फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल, एसएमएस (केवळ अमेरिकेतील मोबाईल ग्राहकांसाठी) आणि ट्विटर अलर्टही मिळतात. ड्रॉपआयओवरील फाईल्स सुरक्षित राहतील, याची पुरेपूर काळजी कंपनीने घेतली असून यावरील फाईल्स कोणत्याही सर्च इंजिनवर डिस्प्ले होत नाहीत.
ड्रॉपआयओचे फायरफॉक्स एक्स्टेंशन वापरूनदेखील तुम्ही फाईल शेअर करू शकता.
याहून अधिक स्टोरेज स्पेस आणि आणखी सुविधा हव्या असतील तर तुम्ही तुमचे ड्रॉपआयओ अकाऊंट अपग्रेडही करू शकता. साधारण एक जीबी स्पेस एका वर्षासाठी हवी असेल तर केवळ १० डॉलरमध्ये तुम्ही ती मिळवू शकता.

Related Posts :0 comments »