,

डोन्ट बी कन्फ्यूझ्ड!

August 20, 2008 Leave a Commentनवा मोबाईल फोन घेताना काही लोक प्रचंड अभ्यास करतात तर काही जण कोणताही विचार न करता आवडलेला फोन थेट घेऊन टाकतात. तुम्ही नेमके कोणत्या गटात मोडता? अभ्यास करणाऱ्यांच्या की थेट जाऊन घेणाऱ्यांच्या? मोबाईल फोन ही अशी वस्तू आहे की जी घेण्यापूर्वी तुम्ही थोडा-फार तरी अभ्यास करायलाच हवा. कारण बाजारात विविध कंपन्यांची शेकडो मॉडेल्स उपलब्ध आहेत आणि त्यात दररोज नव्या फोन्सची भर पडत असते. त्यामुळे मोबाईल घेताना कन्फ्युज्ड माईंड ठेवणे बरोबर नाही. अापले बजेट आणि नेमकी गरज या दोन गोष्टी समोर ठेवून जरी अभ्यास केला तरी पुरेसा ठरतो. तुम्हाला हा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी फोनएग ही साईट मदत करेल.फोनएग या साईटवर ४२ कंपन्यांच्या तब्बल ७४९ हॅंडसेट्सची माहिती साठवलेली आहे. या साईटचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कोणतेही दोन हॅंडसेट कम्पेअर करता येतात. कंपन्यांच्या स्वतंत्र साईटवर संबंधित कंपनीच्याच फोन्सचे कम्पॅरिझन शक्य होते. पण तुम्हाला नोकिया आणि सोनी-एरिक्सनचे मल्टिमीडिया फोन कम्पेअर करायचे असतील तर फोनएग हा उत्तम मार्ग आहे. फोनएगवर ब्रॅंड्स, कम्पॅरिझन आणि टॉप फोन्स असे तीन सेक्शन्स आहेत. Usability, Connectivity, Software, Hardware, आणि Ergonomics या पाच निकषांच्या आधारे फोनएगतर्फे टॉप फोन्स निवडले जातात. याखेरीज तुम्हाला Fastest Processor, Highest Amount of Internal Memory, Highest Camera Resolution, Highest Display Resolution, Highest Ram Amount, Lightest Mobile Phone, Longest Stand-by Time, Longest Talk Time, Slimmest Mobile Phone, Smallest Handset आदी निकषांच्या आधारेदेखील टॉप फोन्स पाहता येतील. केवळ एवढ्या माहितीवर तुमचे समाधान झाले तर उत्तम; अन्यथा कम्पॅरिझन सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कोणत्याही दोन हॅंडसटेच्या फीचर्सची विस्तृत माहिती मिळवू शकता. नव्याने लॉंच होणारे फोन्स फोनएगच्या यादीत सातत्याने अॅड होत असतात. We cannot guarantee the validity of information found here, अशी नम्र सूचना फोनएगने दिली असली तरी या साईटवर तुम्ही नक्कीच विसंबून राहू शकता.
Thanks Ganesh

Related Posts :0 comments »