,

शॉर्टकट्ससाठी अतिरिक्त ‘एफएसआय!’

August 21, 2008 Leave a Comment

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांना शॉर्टकटसाठी केवळ दोन-तीनच जागा उपलब्ध आहेत. एक म्हणजे सिस्टिम ट्रे, दुसरी जागा क्विक लॉंच आणि तिसरी जागा म्हणजे प्रत्यक्ष डेस्कटॉप. एखाद्या फोल्डरचा किंवा अॅप्लीकेशनचा शॉर्टकट डेस्कटॉपवर ठेवून तुम्ही तो सहजरित्या अॅक्सेस करू शकता. पण ट्रेमध्ये आणि डेस्कटॉपवर असे किती शॉर्टकट्स ठेवता येतात? रिसेन्ट डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी तुम्हाला स्टार्ट मेनूत जावेच लागते. हे टाळायचे असेल तर शॉर्टकटसाठी भरपूर जागा उपलब्ध करून द्यायला हवी. पण कुठे आणि कशी?



तुमच्या डेस्कटॉपवर असलेल्या टास्कबारसारखाच अाणखी एक शॉर्टकट बार मिळाला तर? हुलूबुलू सॉफ्टवेअरने तयार केलेले विनएक्सटी हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही शॉर्टकटसाठी अतिरिक्त जागा तयार करू शकता. विंडोजच्या टास्कबारपेक्षा विनएक्सटीचा मेनूबार अधिक फ्लेक्झिबल आहे. यात विविध प्रोग्रम्स, फोल्डर्स यांचे शॉर्टकट्स ठेवता येतात. याखेरीज रिसेन्ट फाईल्सही अॅक्सेस करता येतात. तुम्ही विंडोज व्हिस्टा वापरत असाल तर साईडबारची सवय झाली अाहे.



पण एक्सपी किंवा त्याअगोदरचे व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी रॅम, सीपीयू युसेज, हार्डडिस्क स्पेस आदी गोष्टी डेस्कटॉपवर पाहायला मिळत नाहीत. विनएक्स्टीच्या इन्फोबारमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. विंडोज युझर्सनी वापरून पाहावेच, असे हे प्रॉडक्ट आहे.

विनएक्सटी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »