, ,

अॉनलाईन मिचर्ची!

August 24, 2008 Leave a Comment


इंटरनेटवर शेकडो रेडिओ स्टेशन्स एेकता येतात. यातील अधिकांश स्टेशन्स परदेशी आहेत. आपल्याकडील बहुतांश लोक पाश्चात्य संगीतापेक्षा भारतीय संगीत एेकणे अधिक पसंत करतात. अशा लोकांचा कल जुनी गाणी किंवा लोकल एफएम स्टेशन एेकण्याकडे असतो. दुर्दैव असं की, भारतातील विविध शहरांतून प्रसारित केली जाणारी सर्व एफएम स्टेशन्स अॉनलाईन उपलब्ध नाहीयेत. काही निवडक स्टेशन्स मात्र अॉनलाईन एेकता येतात. रेडिओ टाईम या साईटवर जाऊन तुम्ही भारतासह जगातील कोणत्याही देशातील, कोणत्याही शहरातील रेडिओ स्टेशन एेकू शकता.

रेडिओटाईमवर जाऊन तुम्ही हवा तो खंड, देश, राज्य आणि शहर सिलेक्ट करून तेथे उपलब्ध असलेल्या रेडिओ स्टेशन्सची माहिती पाहू शकता. स्ट्रीमिंगची सुविधा देणारी रेडिओस्टेशन्स तुम्ही थेट ब्राऊजरमध्येच एेकू शकता.



रेडिओटाईमसारख्या अनेक सुविधा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील अनेक सुविधा मी वापरूनदेखील पाहिल्या आहेत. पण रेडिओटाईम ही सर्वांत सोपी आणि हमखास रिझल्ट्स देणारी सुविधा आहे.

रेडिओ एेकण्याचा आणखी एक सोपा मार्गः
तुम्ही जी-टॉक (जी-मेल चॅट नव्हे) वापरत असाल तर तुम्ही त्यातंच पॅरिसहून प्रसारित होणारा रेडिओ तीन ताल एेकू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
१. जी-टॉकमध्ये जाऊन service@gtalk2voip.com हा अॅड्रेस फ्रेंड म्हणून अॅड करा
२. त्यानंतर 110@radio.gtalk2voip.com हाही अॅड्रेस फ्रेंड म्हणून अॅड करा.
३. काही क्षणांनंतर दुसऱ्या अॅड्रेसवर कॉल करा.
४. तुम्ही रेडिओ तीन तालला कनेक्ट व्हाल.

Related Posts :



0 comments »