,

टेक ए ब्रेक

August 25, 2008 Leave a Comment

आजच्या युगात कॉम्प्युटरशिवाय चालणारे क्वचितंच एखादे काम असेल. त्यामुळे प्रत्येकास अॉफिस अवर्स आणि त्यानंतरदेखील कॉम्प्युटरवर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. सतत कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉम्प्युटरवर काम करूनही डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठीचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे ठराविक अंतराने ब्रेक्स घेणे. पण कितीही ठरवले तरी काम करण्याच्या नादात आपण असे ब्रेक्स घेण्यास कायम विसरतो. पण आयडिफेंडर हा प्रोग्राम वापरून तुम्ही आता रेग्युलर ब्रेक्स घेऊ शकाल.

सतत कॉम्प्युटरकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येणे, अस्पष्ट दिसणे, डोकेदुखी, मान आणि पाठदुखी, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची आग होणे, प्रकाशाचा त्रास होणे, कपाळ जड होणे आदी लक्षणे उद्भवू शकतात. याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (CVS) असे म्हणतात. CVS टाळण्यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय योजू शकतो. ठराविक अंतराने ब्रेक्स घेणे हा तो सोपा उपाय. यासाठी आयडिफेंडर हा छोटासा आणि विनामूल्य प्रोग्राम तुम्हाला मदत करू शकतो. आयडिफेंडर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या सिस्टिम ट्रेमध्ये राहतो आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेनंतर (उदा. ३० मिनिटानंतर किंवा ४५ मिनिटांनंतर) तुम्हाला ब्रेक घेण्याची आठवण करून देतो. आठवण करून देण्यासाठी आयडिफेंडर पुढील चार मागर्गांचा वापर करू शकतोः
१. ठरवून दिलेले एखादे चित्र दाखवणे
२. डोळ्यांना आराम देण्यासाठीचे व्हिज्युअल ट्रेनिंग रन करणे
३. डिफॉल्ट स्क्रीनसेव्हर सुरू करणे
४. ब्रेक घ्या, अशी आठवण करू देणारी विंडो पॉप-अप करणे

आयडिफेंडर इन्स्टॉल केल्यानंतर त्यातील अनेक सेटिंग्ज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. एखाद्या दिवशी तुम्हाला भरपूर काम असेल आणि आयडिफेंडरचा अडथळा नको असेल तर तशी सेटिंग्ज तुम्ही करू शकता. किती वेळेनंतर ब्रेक येणार आहे हेही तुम्हाला दिसू शकते. विंडोज ९८, मिलेनियम, २०००, एक्सपी आणि व्हिस्टावर आयडिफेंडर इन्स्टॉल करू शकता.
आयडिफेंडर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :3 comments »

 • antarnad said:  

  Your blog is superb. It is so helpful. I use lots of things suggested by you.

  Keep educating us.

 • Amit Tekale said:  

  Thank you for your kind words. It is people like you who inspire me to write more. Please give your suggestions to improve quality of this blog. Keep posting your queries. Keep reading for more.
  Amit

 • Satish said:  

  khupach chhan...
  thanks for wonderful tips.

  SAtish