, ,

नो टेंशन ट्रॅव्हल प्लॅनिंग

August 29, 2008 Leave a Commentमी जेव्हा-जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा माझ्याकडे संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅन तयार असतो. गाडी किंवा फ्लाईट किती वाजता आहे, त्यासाठी किती अगोदर घरातून निघावे लागेल, प्रवास किती तासांचा आहे, परदेशात जाणार असल्यास कनेक्टिंग फ्लाईटमध्ये किती वेळाचे अंतर आहे, तेथील हवामान कसे आहे, तेथे शहरांतर्गत प्रवासाची काय सोय आहे, हॉटेल कुठे आहे, परतीचा प्रवास कसा आहे वगैरे सर्व बाबींचा अभ्यास करून त्याचे प्रिंटआऊट्स जवळ ठेवण्याची माझी सवय आहे. सुरक्षित प्रवास करायचा असेल तर हे सर्व करणे अत्यावश्यक आहे. तुमच्यापैकीही अनेक जण हे सर्व करत असतील. खरं सांगायचं तर यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि तेवढाच वेळही द्यावा लागतो. उच्चपदस्थ व्यक्तींना हे सर्व करून देण्यासाठी पर्सनल सेक्रेटरी असते. सर्वसामान्य व्यक्ती किंवा बिझी आंत्रप्रिन्युअरना मात्र ही सर्व कामे स्वतःच करावी लागतात. पण ट्रिपइट ही अॉनलाईन सेवा वापरून आंत्रप्रिन्युअर्स बहुमोल वेळेची बचत करू शकतात.
ट्रिपइट ही सेवा तुमच्यासाठी ट्रॅव्हल अॉर्गनायझरचे काम करते. ट्रिपइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही फक्त तुमचा फायनल ट्रॅव्हल प्लॅन (बुकिंग कन्फर्मेशन्स) plans@tripit.com या ई-मेल आयडीवर पाठवायचा. बस्स... ट्रिपइटकडे इटिनरेटर नावाची एक भन्नाट सिस्टिम आहे. या सिस्टिममध्ये तुमचा ट्रॅव्हल प्लॅन एंटर केला जातो. त्यानंतर इटिनरेटर इंटरनेटवर सर्व अतिरिक्त माहिती सर्च करून एक मास्टर ट्रॅव्हल प्लॅन तयार करतो. यात हवामान, नकाशे, ड्रायव्हिंग डायरेक्शन्स, सिटी गाईड, हॉटेल इन्फो आदी सर्व गोष्टींचा समावेश असतो. यासाठी Eventful, Flickr, Google Maps, SeatGuru, Wikipedia आदी साईट्सची मदत घेतली जाते.

Sample TripIt Itinerary
थोडक्यात काय तर जे काम तुम्हाला करावे लागते ते इटिनरेटरतफर्फे केले जाते आणि तुमच्या हातात तयार ट्रॅव्हल प्लॅन येतो. हा ट्रॅव्हल प्लॅन वापरून तुम्ही फ्लाईटसाठी अॉनलाईन चेक-इन देखील करू शकता. हा ट्रॅव्हल प्लॅन प्रिंट स्वरूपात तुमच्या सोबत राहू शकतो किंवा तो तुम्ही मोबाईलवरदेखील अॅक्सेस करू शकता.

Related Posts :2 comments »

  • funny rates said:  

    i think you add more info about it.

  • lottery gambling said:  

    I agree with you about these. Well someday Ill create a blog to compete you! lolz.