साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे नवे रूप

September 29, 2008 Leave a Comment

साधी-सोपी टेक्नॉलॉजी हा ब्लॉग सुरू करून चार महिने पूर्ण झाले. या कालावधीत विविध अॉनलाईन सेवा, दैनंदित वापरात येतील अशा सेवा, टिप्स, ट्रिक्स आदी माहिती मी तुम्हाला दिली. यात अशीच भरही पडत राहील. गेल्या चार महिन्यांत मी तीन वेळा साईटचे टेम्प्लेट बदलले. त्याला काही कारणे होती. काल बदललेल्या टेम्प्लेटबाबत आणि साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या काही नव्या फीचर्सबाबत मी आज माहिती देणार आहे.
नवे फीचर!: स्क्रिबिट


आपण पाहत असलेले हे टेम्प्लेट मूळ वर्डप्रेसचे टेम्प्लेट आहे. थीमलिबने हे टेम्प्लेट ब्लॉगरसाठी कन्व्हर्ट केले असून ते काही दिवसांपूवर्वीच रिलीज करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी टेम्प्लेटची वाट पाहत होतो. वाचकास रिफ्रेश करणारे हे टेम्प्लेट आहे, असे मला वाटते. आपली मते आपण मांडू शकता. टेम्प्लेट बदलासोबत स्क्रिबिट नावाचे फीचर मी अॅड केले आहे. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांनी रुचतील, उपयोगास येतील अशा अाशयाची माहिती मी या ब्लॉगद्वारे देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, कोणत्याही व्यक्तीची नेमकी गरज ओळखायची असल्यास त्याच्याशी थेट संवाद साधण्यासारखा दुसरा मार्ग नाही. स्क्रिबिटच्या माध्यमातून असा थेट संवाद होऊ शकतो. Suggest a future post for Sasotechnology यावर क्लिक करून तुम्हाला यात कोणत्या विषयावरील माहिती हवी आहे हे तुम्ही १०० कॅरेक्टर्समध्ये कळवू शकता. इतर कुणास त्याच विषयावर माहिती हवी असल्यात त्यापुढील व्होट यावर क्लिक करावे. स्क्रिबिट हे फीचर पानाच्या तळाशी प्लेस केलेले आहे.
Page Navigation

याशिवाय होमपेजवर जास्त पोस्ट्सची गदर्दी करण्याएेवजी केवळ पाच पोस्ट्स ठेवून इतर पोस्ट पाहण्यासाठी आकर्षक पेज नेव्हिगेशन दिलेले आहे. याचा वापर करून तुम्ही अगोदरच्या पोस्ट्स अॅक्सेस करू शकता. यामुळे पेज लोड होण्यासही कमी वेळ लागतो. पॉप्युलर पोस्ट्स या लिंकचा वापर करून तुम्ही आतापर्यंत सवर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोस्ट्स वाचू शकाल.
आगामी काळात आणखी काही नवी फीचर्स अॅड करण्याचा प्रयत्न आहे.

साधी-सोपी टेक्नॉलॉचीचे नवे रूप तुम्हास कसे वाटले, हे जरूर कळवा. आपल्या सर्व सूचनांचे स्वागत आहे.

Related Posts :



0 comments »