,

िमस्टर अपटाईम

September 29, 2008 Leave a Comment

सवयीने आपण रोज काही निवडक साईट्सना भेट देत असतो. यापैकी एखादी साईट कधी डाऊन असेल तर आपल्यालाच अस्वस्थता येते. आता सुरू झाली असेल, असे म्हणत आपण दर पाच मिनिटांनी ती साईट रिफ्रेश करून पाहतो. मग शंका येते की आपल्याच कनेक्शनमध्ये काही गडबड तर नाही? मी अगोदरच्या एका पोस्टमध्ये डाऊन फॉर एव्हरीवन अॉर जस्ट मी डॉट कॉम या सेवेबद्दल माहिती दिली होती. त्याचा वापर करून समजू शकते की साईटला प्रॉब्लेम आहे, नेटवर्कला नाही. आता काय करायचं? साईट केव्हा सुरू होईल, ही अस्वस्थता काही केल्या जात नाही.



ही अस्वस्थता बाजूला ठेवून शांतपणे तुमचे काम सुरू ठेवा. इतर साईट्स सर्फ करा. तुम्हाला साईट अप झाल्याचा अलर्ट देण्याची व्यवस्था मिस्टर अपटाईमने केलेली आहे. होय. मि. अपटाईम हे फायरफॉक्स एक्स्टेंशन वापरून तुम्ही डाऊन असलेल्या साईट्सवर नजर ठेवू शकता. मि. अपटाईम हे एक्स्टेंशन फायरफॉक्स २.० आणि त्यापुढच्या व्हर्जनवर रन करता येते. फायरफॉक्स ३.० साठीचे व्हर्जन अद्याप रिलीज झालेले नाही. एखादी साईट डाऊन असेल तर सहसा 404 Not Found असा मेसेज येतो. याला एचटीटीपी स्टेटस कोड असे म्हणतात. 404 प्रमाणे 200 हा कोड साईट ओके असताना वापरला जातो. मि. अपटाईम या स्टेटस कोडचा आधार घेऊन आपल्याला साईट अप झाल्याचा अलर्ट देतो. एखाद्या साईटवर वेगळा एरर मेसेज येत असेल तर त्यातील काही कीवडर्ड्स वापरून तुम्ही ते मि. अपटाईममध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे त्या साईटवरून तो कीवर्ड नाहीसा झाला की साईट अप झाल्याचा अलर्ट तुम्हाला मिळेल. मि. अपटाईम पहिल्या ६० मिनिटांत दर पाच मिनिटाला साईट ट्रॅक करतो. त्यापुढील १२० मिनिटांत दर दहा मिनिटांस, त्यानंतरच्या १८० मिनिटांत दर पंधरा मिनिटांस, त्यापुढील २४० मिनिटांत दर अध्यर्ध्या तासास आणि त्यानंतर दर तासास साईट ट्रॅक करतो. किती वेळ साईट ट्रॅकिंग सुरू ठेवायचे आहे, हे तुम्ही ठरवू शकता. फायरफॉक्स ओपन असेपर्यंत मि. अपटाईमचे ट्रॅकिंग सुरू राहते. मि. अपटाईम वापरण्यास संपूर्ण सुरक्षित अाहे.

Related Posts :



0 comments »