भली मोठी रिसर्च ई-लायब्ररी!

October 11, 2008 Leave a Comment

कल्पना करा की, तुम्ही एखाद्या विषयावर रिसर्च करत अाहात आणि तुमच्या विषयाशी संबंधित एक रिसर्च पेपर अमूक एका साईटवर उपलब्ध आहे, अशी मािहती तुम्हाला एका मित्राने दिली. तुम्ही म्हणाल काहीही कर पण मला त्या साईटचं नाव सांग. त्यावेळी नेमकं त्याला त्या साईटचं नाव आठवत नाही. तो काहीतरी उलटं-सुलटं नाव सांगतो. भलतीच साईट ओपन झाल्याने तुमची फजिती होते. एकूण काय तर, उपयुक्त माहिती असूनही एेनवेळी सापडत नाही. रिसर्चच्या बाबतीत असं कायम होतं. अनेकवेळा बिनकामाची माहिती समोर येते. तासभर सर्च केल्यानंतर चार ओळी हातास लागतात. तुमच्यासारख्या रिसर्चरसाठी माहितीचा खजिना म्हणजे सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क.

एसएसआरएन अथर्थात सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क म्हणजे सुमारे दीड लाखांहून अधिक रिसर्च पेपरची ई-लायब्ररी. जरा खालील आकडेवारीवर नजर टाका...म्हणजे तुम्हाला या नेटवर्कच्या ताकदीचा अंदाज येईल.



सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क १६ विषयांत विभागलेले आहे. अकाउंटींग, इकॉनॉमिक्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट आदी विषयांतील सुमारे एक लाखाहून अधिक रिसर्चर्सने केलेले काम या नेटवर्कमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. यातील बहुतांश रिसर्च पेपर्स डाऊनलोड करता येऊ शकतात. काही मोजके पेपर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतात. तुम्हाला हव्या त्या रिसर्च कॅटेगरीत जाऊन तुम्ही कीवर्डने क्विकसर्च करून त्या विषयातील रिसर्च वर्क पाहू शकता.



संबंधित पेपर कोणी आणि कधी सबमिट केला आहे, तो आतापर्यंत किती जणांनी डाऊनलोड केला आहे, आदी माहिती यावर उपलब्ध असते. सोशल सायन्स रिसर्च नेटवर्कवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही अनेक फीचर्स वापरू शकता. तुमचे रिसर्च पेपरही तुम्ही सबमिट करू शकता.

Related Posts :



0 comments »