,

टेन्शन फ्री ट्रॅव्हल

October 13, 2008 Leave a Comment


तुम्हाला भटकंती करायला आवडतं? आवडत असल्यास तुमच्यासाठी एका भन्नाट साईटची माहिती मी आज देणार आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी व्हॅकेशन किंवा बिझनेससाठी जायचं असेल तर तुम्ही अगोदर इंटरनेटवर सर्च करून संबंधित ठिकाणाबद्दल आवश्यक ती माहिती गोळा करता. त्या ठिकाणापर्यंत जाण्याचे मार्ग, हवामान, हॉटेल्स, ट्रान्स्पोर्ट, बाजार, सेफ्टी आदी सगळ्या गोष्टी आपल्याला विविध साईट्सवरून किंवा ब्लॉग्जवरून गोळा कराव्या लागतात. ही सर्व माहिती एका ठिकाणी मिळाली तर?

विकास, संजय आणि करन या तीन तरुणांनी मिळून मस्ट सी इंडिया ही साईट लॉंच केली आहे. या साईटचे प्रमोशन झाले नसल्यामुळे ती अजून फारशी लोकप्रिय झालेली नाही. तथापि, या साईटची उपयुक्तता पाहता ती लवकरच लोकप्रिय होईल असे वाटते. भारतात कुठेही पर्यटनास जाणाऱ्या व्यक्तीस टेन्शन फ्री ठेवण्याच्या उद्देशाने या तिघांनी मस्ट सी इंडिया ही साईट डेव्हलप केली.ही साईट सध्या बीटा फेजमध्ये असल्याने यावर रजिस्टर होण्यासाठी इन्व्हिटेशन लागणार आहे. तुम्ही इन्व्हिटेशनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा. रजिस्ट्रेशन न करता देखील या साईटवरील माहिती अॅक्सेस करता येते. यात विविध राज्यातील पर्यटनस्थळांची यादी आहे. त्यापुढे ते स्थळ कोणत्या गटात मोडते (उदा. तीर्थक्षेत्र, थंड हवेचे ठिकाण, समुद्रकिनारा इ.) तेही दिलेले आहे. संबंधित ठिकाणावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणाबद्दलची सर्वसाधारण माहिती, तेथील विशेष अाकर्षणे, हवामान, जाण्याचे मार्ग, नकाशे, फोटो आणि ट्रॅव्हल ब्लॉग्ज आदी सर्व माहिती एका पेजवर मिळते. तेथील आकर्षणांची कॅटेगरीवाईज लिस्टही पाहायला मिळते. त्यावरून तुम्ही काय पाहायचे हे ठरवू शकता. शिवाय त्या ठिकाणाजवळ असणाऱ्या इतर पर्यटनस्थळांची माहितीही मिळते. एक-दोन दिवसांत जाऊन येण्यासारख्या वीकेन्ड गेटवेजचादेखील स्वतंत्र सेक्शन यात आहे.

मस्ट सी इंडियातून केवळ भारतातील पर्यटनस्थळांची माहिती मिळते. परदेशातील पर्यटनस्थळांची अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एनट्रिप या साईटला भेट देऊ शकता. लंडनस्थित एनट्रिप या कंपनीने पुण्यात अापले डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे.

Related Posts :0 comments »