युजरनेम क्रायसिस!

October 16, 2008 Leave a Comment

Desired Username: coolguy2008

coolguy2008 is not available, but the following usernames are:
coolguy183
coolguy665
coolguy454
coolguy934

coolguy2008 हे युजरनेम उपलब्ध नसल्यामुळे जी-मेलने दिलेले हे अॉप्शन्स पाहून शैलेशला हसावे की रडावे हे कळेना. आपल्याबाबतीतही असे अनेकदा घडते. आपल्याला एका ठराविक युजरनेमची सवय झालेली असते. त्यामुळे आवश्यक त्या सर्व सेवांसाठी रजिस्ट्रेशन करताना आपण तेच युजरनेम वापरण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या ठिकाणी हवे ते युजरनेम उपलब्ध नसल्यास अगदी किरकोळ बदल करून आपण तेच युजरनेम वापरतो. पण असे काहीतरी भलतेच अॉप्शन आल्यास काय करणार?

युजरनेमचेक या सेवेचा वापर करून आपल्याला हवे ते युजरनेम कोण-कोणत्या सेवेसाठी उपलब्ध आहे, हे एका ठिकाणी चेक करू शकतो. म्हणजे त्यासाठी प्रत्येक साईटवर जाऊन availability चेक करण्याची गरज नाही. आता आपण coolguy2008 हेच युजरनेम कुठे-कुठे उपलब्ध आहे ते चेक करू.युजरनेमचेक डॉट कॉमवर जाऊन तेथे केवळ तुम्हाला चेक करावयाचे असलेले युजरनेम एंटर करा. सुमारे ६८ सोशल शेअरिंग, सोशल बुकमार्किंग, सोशल नेटवर्किंग आणि ई-मेल साईट्सवर संबंधित युजरनेम उपलब्ध आहे किंवा कसे याची माहिती लगेचच तुम्हाला मिळते. प्रत्येक साईटवरून डेटा फेच करून ही माहिती पुरवली जाते. यासाठी किमान २ ते ३ मिनिटे लागतात.
त्यानंतर तुम्ही युजरनेम बदलण्याचा विचार करू शकता किंवा ज्या साईट्ससाठी ते युजरनेम उपलब्ध आहे त्यावर रजिस्टर होऊ शकता.

Related Posts :0 comments »