, ,

फ्रेश वॉलपेपर्स!

October 15, 2008 Leave a Comment

तुमच्यापैकी अनेकांकडे आयफोन किंवा आयपॉड टच असेल. मोबाईल फोनवर नवे, फ्रेश वॉलपेपर टाकण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. त्यामुळे एखाद्याकडे सुंदर वॉलपेपर दिसला की लगेच तो ब्लुटूथवरून ट्रान्स्फर करून घेतो. आयफोन किंवा आयपॉड टचमध्ये ब्लुटूथची सुविधा नसल्यामुळे आयट्यून्स चा वापर करून डेटा ट्रान्स्फर करावा लागतो. आयफोनची स्क्रीन साईज इतरांपेक्षा मोठी असल्याने सर्वसाधारण इमेजेस वॉलपेपर म्हणून वापरता येत नाहीत. त्यासाठी इमेज रिसाईज करून घ्यावी लागते. पण आज मी तुम्हाला आयफोन, अायपॉड आणि इतर सर्व मोबाईल फोनसाठी वापरता येण्यासारख्या वॉलपेपर्सच्या खजिन्याची किल्ली देणार आहे.

पूल्गा या वेबसाईटवर तुम्हाला आयफोन आणि आयपॉडसाठी तयार केलेले असंख्य वॉलपेपर्स मिळतील.
हौशी कलाकारांनी तयार केलेले वॉलपेपर्स या साईटवरून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. संबंधित वॉलपेपर आयफोन किंवा आयपॉड टचवर घेण्यासाठी आयट्यून्सला जोडून सिंक्रोनाईज करा आणि फोटोज आयकॉनवर क्लिक करून वॉलपेपर म्हणून सेट करू शकता. तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हीदेखील तुमच्या कलाकृती पूल्गावर ठेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे इन्व्हिटेशन लागते. इन्व्हिटेशनसाठी इथे क्लिक करा.हे झाले आयफोन आणि आयपॉड टचसाठी. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे आयफोन नाही. आम्ही काय करायचे? त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही मोबोपिक या सेवेचा वापर करून आयफोनसाठी तयार केलेले वॉलपेपर तुमच्या मोबाईलच्या आकारात रिसाईज करून वापरू शकता. मोबोपिकच्या डिरेक्टरीत तुमचा फोन नसेल तर अगोदर फोनची स्क्रीन साईज (पिक्सेल्स) माहित करून घ्या. त्यानंतर पिक्सलर या सेवेचा वापर करून संबंधित वॉलपेपर रिसाईज किंवा क्रॉप करून तुमच्या फोनसाठी कन्व्हर्ट करा.

पूल्गावरून डाऊनलोड केलेली इमेजिपक्सलर वापरून नोकिया E71साठी कन्व्हर्ट केलेली इमेज (३२० बाय २४० पिक्सेल्स)


Related Posts :0 comments »