,

न्यू, इम्प्रूव्ह्ड जी-मेल मोबाईल २.०

October 24, 2008 Leave a Comment

तुमच्यापैकी अनेक जण मोबाईलवर ई-मेल पाहण्यासाठी जी-मेल अॅप्लीकेशन वापरत असतील. ज्यांनी अद्याप हे अॅप्लीकेशन वापरले नसेल त्यांच्यासाठी आणि जे वापरत अाहेत, त्यांच्यासाठीही खूषखबर आहे. जी-मेल मोबाईलचे लेटेस्ट व्हर्जन काल लॉंच झाले. या व्हर्जनबद्दल मी आज माहिती देणार आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० असे या नव्या व्हर्जनचे नामकरण करण्यात आले आहे. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या डेरेक फिलीप्स या अभियंत्याने जी-मेल आणि गुगल मोबाईल ब्लॉगवर या व्हर्जनच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. या अगोदरच्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी होत्या - उदा. स्क्रोलिंगमध्ये अडचणी येत असत, एक वेळी केवळ एकच ई-मेल ड्राफ्ट ठेवता येत असे, एका वेळी एकच जी-मेल अकाऊंट configure करता येत असे वगैरे. नव्या व्हर्जनमध्ये यातील अनेक त्रुटी दूर करून मोबाईलवर कम्प्लीट ई-मेल एक्स्पीरिअंस देण्याचा प्रयत्न केला आहे.जी-मेल फॉर मोबाईल २.०ची काही वैशिष्ट्येः
१. स्पीड इम्प्रूव्हमेंटः स्क्रीन फ्रीझ होण्याचे प्रकार कमी, पूवर्वीपेक्षा अधिक स्मूद स्क्रोलिंग
२. मल्टिपल अकाऊंट्सः एकावेळी अनेक जी-मेल अकाऊंट्स configure करण्याची सुविधा. अगोदरच्या व्हर्जनमध्ये एकावेळी एकच अकाऊंट वापरता येत असे.
३. अॉफलाईन सपोर्टः सिग्नल नसतानादेखील नव्याने आलेले ई-मेल्स अॅक्सेस करता येतात.
४. मल्टिपल ई-मेल ड्राफ्ट्सः एकावेळी अनेक ड्राफ्ट्स सेव्ह करून ठेवता येतात.
५. शॉर्टकट कीजः QWERTY कीबोर्डचा मोबाईल असल्यास शॉर्टकट कीज वापरता येतात. उदा. Undoसाठी Z, New conversationसाठी k, old conversationसाठी j वगैरे. अधिक शॉर्टकट्ससाठी अॅप्लीकेशनमध्ये जाऊन Menu/Help वर क्लिक करा.
६. ३५ भाषांचा सपोर्टः तुमच्या मोबाईलच्या डिफॉल्ट लॅंग्वेजनुसार जी-मेल फॉर मोबाईल २.० लॅंग्वेज सिलेक्ट करतो. यात हिंदीसह ३५ जागतिक भाषांचा समावेश आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन m.google.com/mail ही लिंक अॅक्सेस करा. तुम्ही अगोदरचे व्हर्जन वापरत असाल तर याच लिंकवर जाऊन नवे व्हर्जन डाऊनलोड करा व अाधीचे व्हर्जन रिप्लेस करा.

Related Posts :1 comments »

 • Mandar Joglekar said:  

  Namaskar,

  Please do post your blogs on www.MyVishwa.com too. That way larger audience will get benefited.

  Thank you
  ..Mandar M. Joglekar
  President & CEO MyVishwa
  MyVishwa - "We Create Time"
  http://www.MyVishwa.com