,

जस्ट प्रिंटेबल्सः कॅलेंडर्स, लिस्ट्स, गेम्स आणि बरंच काही...

October 23, 2008 Leave a Comment

भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान;
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान

ही कशाची जाहिरात आहे, हे वेगळं सांगायला नको. तुम्ही देशात असा की परदेशात, सण, तिथी, मुहूर्त पाहण्यासाठी कालनिर्णय किंवा तत्सम कोणतेही मराठी कॅलेंडर भिंतीवर असायलाच हवे. काळाबरोबर कालनिर्णयने देखील योग्य निर्णय घेऊन कार कालनिर्णय वगैरे प्रकार बाजारात आणले. असो. नोव्हेंबर, डिसेंबर आला की आपल्याला पुढील वषर्षाच्या कॅलेंडरचे वेध लागता. हल्ली कॉम्प्युटर, मोबाईलमुळे भिंतीवरच्या कॅलेंडरची फारशी गरज भासत नाही. पण तरीदेखील आपल्यापैकी अनेकांना डेस्क कॅलेंडर किंवा पॉकेट कॅलेंडरची सवय असते. आपल्याला हवे तसे, हव्या त्या आकारातले कॅलेंडर बाजारात काही केल्या मिळत नाही.

अशावेळी तुम्ही ई-प्रिंटेबल कॅलेंडर्स ही सेवा वापरू शकता. काही सेकंदात तुम्हाला हव्या त्या महिन्याचे किंवा वषर्षाचे कॅलेंडर हव्या त्या आकारात तयार करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तुम्ही फक्त महिना, वर्ष, आकार आणि रंग निवडायचा, िक्रएट वर क्लिक करायचे आणि तयार कॅलेंडर थेट प्रिंट करून घ्यायचे.



Create:



And print:




याच साईटवर प्रिंट करून घेण्याजोग्या अनेक गोष्टींची यादी आणि तयार टेम्प्लेट्स आहेत. उदा. नेहमी लागणाऱ्या किराणा सामानाची यादी तुम्ही कस्टमाईज करून प्रिंट करू शकता. या शिवाय टू-डू लिस्ट, वीकली प्लॅनर, बॉडी वेट चार्ट, लोन रिपेमेंट चार्ट, फ्लॅश कार्ड्स, गेम्स आदी अनेक गोष्टी यात तुम्हाला सापडतील.

Related Posts :



0 comments »