,

ओन्ली कीबोर्ड!

November 26, 2008 Leave a Comment

तुम्हाला माऊसपेक्षा कीबोर्ड वापरणे अधिक आवडत असेल तर जर्मनीच्या एका तरुणाने तयार केलेले नवे मेटा-सर्च इंजिन तुम्हाला नक्कीच आवडेल. माऊसलेस सर्चिंगचे उद्दिष्ट ठेवून २१ वषर्षीय ज्युलिअस एकर्टने कीबोर्डर ही साईट सुरू केली आहे. Navigate with arrow keys. Open with enter, असे या साईटचे ब्रीदवाक्य आहे.

इंटरॅक्टिव्ह इंटरफेस ही कीबोर्डरची खासियत. कीबोर्डरचे होमपेज अगदी गुगलप्रमाणेच स्वच्छ आहे. पेजच्या मध्यभागी डिजिटल घड्याळ आहे. होमपेजवर अगदी वर डाव्या बाजूस सर्च बॉक्स आहे. सर्च क्वेरी दिल्यानंतर घड्याळ नाहीसे होऊन गुगल, गुगल इमेजेस, विकिपेडिया, यू ट्यूब आदी साईट्सवरून फेच केलेले रिझल्ट्स दिसतात. कीबोर्डवरील अॅरो कीजने तुम्ही नेव्हिगेट करू शकता. एंटर केल्यास संबंधिक रिझल्ट ओपन होईल. All Results वर क्लिक केल्यास तुम्ही संबंधित साईटच्या (उदा. गुगल) रिझल्ट पेजवर जाऊ शकाल. भविष्यात फ्रेंडफीड, डेलिशियस, फ्लिकर, गुगल डॉक्स आणि आणखी बऱ्याच साईट्सवरील रिझल्ट्स फेच करण्याची एकर्टची योजना आहे.

कीबोर्डरचे होमपेज

कीबोर्डरचे रिझल्टपेज


टिपः कोणतीही साईट केवळ कीबोर्डच्या आधाराने ओपन करण्यासाठी तुम्हा फायरफॉक्सचे माऊसलेस ब्राऊजिंग हे एक्स्टेंशन वापरू शकता.

Related Posts :0 comments »