सर जो तेरा चकराये...

November 27, 2008 Leave a Comment

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या बहुतेकांचे डेस्कटॉप एकसारखेच दिसतात. स्क्रीनच्या डाव्या बाजूस झालेली आयकॉन्सची गदर्दी हा नेहमीचा सीन. काहीजणांचे अख्खे डेस्कटॉप आयकॉन्सने भरलेले असते. डेस्कटॉपवर अगदी मोजक्या प्रोग्रामचे शॉर्टकट्स आणि नेहमी लागणारी डॉक्युमेंट्स ठेवण्याची प्रथा आहे. पण आपण याला न जुमानता वाट्टेल ते डॉक्युमेंट डेस्कटॉपवर स्टोअर करतो आणि मग एक वेळ अशी येते की त्या गदर्दीत महत्त्वाचे डॉक्युमेंट सापडत नाही. डेस्कटॉपवरील गदर्दी कमी करण्यासाठी विंडोज वापरणारे ‘ट्रे’चा आधार घेतात. या ‘ट्रे’चे मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे मॅकिन्तोषवरील डॉक. मॅकिन्तोषच्या डॉकचे अनुकरण करणारे अनेक प्रोग्राम्स (उदा. रॉकेट डॉक, अॉब्जेक्ट डॉक) प्रचलित आहेत, पण त्यात इंटेलिजन्स दिसून येत नाही. एरिक वॉंग या गृहस्थाने शक्कल लढवून डॉकची संकल्पनाच बदलली आहे. जाणून घेऊयात त्याची ही नवी कल्पना...

जिथे माऊस, ितथे डॉक ही सर्कल डॉक मागील प्रमुख संकल्पना. मॅकिन्तोषमधील डॉकप्रमाणे विंडोजसाठीदेखील अनेक डॉक तयार झाले. पण हे सगळे डॉक स्क्रीनच्या कोणत्यातरी एका बाजूस प्लेस करावे लागतात. त्यामुळे एखाद्या आयकॉनवर क्लिक करायचे झाल्यास माऊस त्यावर न्यावा लागतो. सर्कल डॉक अॅक्टिव्हेट करायचे झाल्यास केवळ एक हॉट-की (उदा. F1) दाबल्यास जिथे माऊस पॉईंटर आहे, त्याभोवती सर्कल डॉक डिस्प्ले होईल. आकाराने गोल असल्यामुळे हा डॉक स्क्रीनवर कुठेही प्लेस झाला तरी अॅक्सेसिबल होतो. स्क्रीनच्या एका बाजूस गेला तरी न दिसणाऱ्या भागातील आयकॉन्स स्क्रोल व्हीलच्या साह्याने डेस्कटॉपवर आणता येतात.



सर्कल डॉकमध्ये ड्रॅग करून अॉयकॉन्स अॅड करता येतात. उदा. तुम्हाला इंटरनेट एक्स्प्लोरर सर्कल डॉकमध्ये अॅड करायचे आहे. संबंधित प्रोग्रामचा आयकॉन प्रोग्राम फाईल्समधून थेट सर्कल डॉकवर ड्रॅग केला की त्याचा शॉर्टकट तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या प्रोग्रामचे अथवा डॉक्युमेंटचे शॉर्टकट सर्कल डॉकवर तयार करू शकता. सर्कल डॉकमध्ये अनेक कस्टमायजेशन्स शक्य आहेत. सर्कल डॉक एक ओपन सोर्स प्रोजेक्ट असल्यामुळे यातील फीचर्समध्ये व्हॅल्यू अॅडिशन होण्याची शक्यता अधिक आहे.
विंडोज एक्सपी आणि विंडोज वापरणाऱ्याना सर्कल डॉक वापरता येईल. विंडोज एक्सपीवर मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क नसेल तर येथून डाऊनलोड करता येईल.
सर्कल डॉक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तुमचा अनुभव शेअर करण्यास विसरू नका.

Related Posts :



6 comments »

  • Anonymous said:   This comment has been removed by the author.
  • Anonymous said:  

    तुमची पोस्ट वाचल्यावर मी सर्कल डॉक डाऊनलोड केले आणि वापरायला सुरुवातपण केली आहे. छान वाटतंय ते! सगळ्यात मुख्य म्हणजे डेस्कटॉप वरची आयकॉन्सची गर्दी कमी झाली!! शिवाय वापरायला पण सोप्पं आहे ते.

    http://my.opera.com/prabhas/blog

  • veerendra said:  

    जब्बरदस्त !
    एक नंबर पोस्ट .. खरच खूप नवी माहिती मिळाली आणि मी ते वापरायला ही लागलोय !
    धन्यवाद !

    ;)

  • StayLinked said:  

    this is the best computer tip.

    thanks a lot

  • Prachi said:  

    ब्लॉगवर Advertise publisher कसे बनता येईल. Google AdSense सारख्या सेवा ब्लॉगवर वापरताना येतील का?

  • Amit Tekale said:  

    नमस्कार प्राची.
    तुला एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करायची करायची आहे की तुझ्या ब्लॉगवर जाहिराती डिस्प्ले करायच्या आहेत?
    जाहिरात करायची असेल तर Google Adwords वापरावे लागेल. तुझ्या साईटवर किंवा ब्लॉगवर जाहिराती डिस्प्ले करायच्या असतील तर Google Adsense वापरता येईल.